३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार…

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत आज महत्त्वाची विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. गंभीर गुन्हेगारी आरोपांमध्ये अटक झाल्यास किंवा ताब्यात घेतल्यास पंतप्रधानांपासून ते राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि जम्मू आणि काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकांद्वारे केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी बुधवारी संसदेत तीन विधेयके मांडली जाणार असल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केला, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी विरोधकांची मागणी

विधानसभेच्या कामकाजावर पूर्ण दिवसासाठी टाकला बहिष्कार मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज विरोधक आक्रमक झाले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. […]

अधिक वाचा..

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त प्रवास या जीवनचरित्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

ठाणे: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांच्या एकसष्ठी निमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ” प्रवास ” या कृतज्ञता दर्शक चरित्राचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होत असून प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत. अशी माहिती निमंत्रक व युवासेना […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या दोघांवर कारवाई करा…

साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी साधू कटके आणि यांचे पुत्र संतोष कटके यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून साधू कटके आणि संतोष कटके वर कठोर कायदेशीर […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जाते. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १ वर्षांत कक्षाकडून १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे क्रांतिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जागे व्हा…

मुंबई: माध्यमकर्मीसाठी  बदललेल्या काळ आणि परिस्थितीनुसार पत्रकार धोरण, पत्रकार सर्वसुरक्षा आणि सर्वसामावेशक हितासाठी लोकशाहीच्या इतर तिन्ही स्तंभाप्रमाणे त्यांच्या सन्मानासाठी निवृत्तीनंतर आणि काम करतानाही हितकारक कृती होण्याची गरज होती व आहे. मात्र आपल्या राज्यातील एकूणच स्वार्थी अराजकी पाहता कोणत्याही राजकारण्याला अथवा आपणास पत्रकारांसाठी सर्वसामावेशक अशी ठोस भूमिका घेण्याची गरज वाटत नाही असे दिसून येते. जर राज्यकर्तेच […]

अधिक वाचा..

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक; त्यांचा एक पाय कायम दिल्लीत…

सहा-सहा जिल्ह्यांना एक पालकमंत्री; प्रशासन ठप्प, जनता वाऱ्यावर… मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक पाय कायम दिल्लीतच असतो, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पत्रकारांशी […]

अधिक वाचा..

शिंदे – फडणवीस सरकार घटनाबाह्य नैतिकता म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…

मुंबई: छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहेत. शिंदे फडणवीस सरकार हे घटनाबाह्य रित्या स्थापन झाल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे, त्यामुळे नैतिकता बाळगून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन पदावरून पायउतार व्हावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महाराष्ट्र, देश,शिवसेना व ज्यांनी […]

अधिक वाचा..

उष्माघातामुळे स्त्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही स्त्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात काढणार धनुष्यबाण यात्रा

छत्रपती संभाजीनगरमधून होणार यात्रेची सुरुवात औरंगाबाद: शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे. 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून या सभेला सुरवात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे […]

अधिक वाचा..