संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरीब रुग्णांसाठी देवदूत; प्रा डॉ तानाजीराव सावंत

महाराष्ट्र

करमाळा: सध्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून सर्वसामान्यांना उपचार करणे आटोक्याच्या बाहेर जात आहे अशा परिस्थितीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष घेत असलेली वैद्यकीय शिबिरे सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरत आहेत असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले.

आज करमाळा येथे शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य शिबिरासाठी नगर पुणे सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठ १२ हॉस्पिटलचे जवळपास 50 तज्ञ डॉक्टर उपस्थित होते सलग तीन दिवस हे महा शिबिर चालणार असून यामध्ये जवळपास तीन हजार रुग्णांची तपासणी केली जाणार आहे यामध्ये रुग्णांना मोफत चष्मे मोफत औषध वाटप करण्यात येत आहे.

गंभीर आजार निष्पन्न झाल्यास किंवा एखादी ऑपरेशन करण्याचे गरज भासल्यास शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या वतीने मोफत ऑपरेशन सर्जरी करून देण्याची नियोजन करण्यात आले आहे. शिबिरासाठी रुग्णांनी प्रचंड गर्दी केली होती. पंढरपूर येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर शीतल शहा यांनी बालकांचे तपासणी केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले की संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गेली आठ महिन्यात जवळपास 40 कोटी रुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णांना केली असून एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे आलेला रुग्ण कधीही मोकळ्या हाताने परत येत नाही हा त्यांचा इतिहास आहे.

आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉ तानाजीराव सावंत यांनी माता सुरक्षित तर सुरक्षित ही योजना राबवून जवळपास तीन कोटी महिलांची तपासणी आरोग्य खात्यामार्फत केली आहे शिवाय आता या शासनाच्या माध्यमातून आरोग्य मंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 0 ते 15 या वयाच्या सर्व मुलांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जात आहेत खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारी सरकार असून अशाच पद्धतीचे महा आरोग्य शिबिरे गावोगावी जर सर्वांनी घेतली सामान्य रुग्णांना आधार मिळणार आहे व यातून मिळणारे समाधान लाख मोलाचे आहे असे प्रतिपादन केले.