शिरुर तहसिल कार्यालयात कलेक्टर आले रे आले …

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात कलेक्टरसाहेब कार्यालयीन तपासणी शनिवार (दि. ७) रोजी येणार होते त्या आधीही महीनाभरापुर्वी ते येणार होते. त्यामुळे तहसिल कार्यालयात मोठी जय्यत तयारीही झाली होती. सगळीकडे साफसफाई होऊन विविध संकलनाची पुर्वतयारीही झाली होती. तलाठी, मंडल आधिकारी, कर्मचारी यांची याबाबत बैठक होऊन दत्पर तपासणीची तयारीही झाली होती. अनेक नागरीकांची गेली अनेक दिवसांपासून […]

अधिक वाचा..

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी केला बसने प्रवास

शिक्रापूर ते कोरेगाव प्रवासात केली समाज बांधवांची विचारपूस शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणेफाटा येथील 1 जानेवारी या शौर्यदिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेत शिक्रापूर व लोणीकंद येथे स्वतंत्र पार्किंग करुन समाजबांधवांना बसने विजयस्तंभ येथे घेऊन जाण्यात येत असताना चक्क जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी बसमधून प्रवास करत समाज बांधवांची विचारपूस केली […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अवजड वाहन चालकांकडून केराची टोपली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे रस्त्यावर होणारी वाहतुकोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ठराविक वेळेत अवजड वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश दिलेले असताना सुद्धा अवजड वाहतूक बंदच्या वेळेमध्ये देखील रस्त्यावर अवजड वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीत भर पडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने येथील वाहतूक कोंडी सोडवण्याची […]

अधिक वाचा..

अन पुजाचे कलेक्टर होण्याचे स्वप्न अखेर राहिले अधुरे

शिरुर (अरुणकुमार मोटे): “माझी पोरगी लयं हुशार व्हती सायेब, तिला कलेक्टर व्हायचं व्हतं, माझ घरदार तीच पुढं घेऊन जाणारी व्हती ओ, पण तीच आम्हाला सोडून गेली, आता सारं संपलय” असा निशब्द शांततेत हुंदका ऐकला अन भिमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक प्रदिप वळसेंच्या डोळ्यात चटकन अश्रू तराळले. अन उपस्थितांनाही गहिवरुन आले. अंत्यसंस्कारावेळी जांबूत ग्रामस्थांनी सुमारे १ लाखाहून […]

अधिक वाचा..

औरंगाबादकरांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रिक्षा भाडे दरवाढीस मंजुरी..

औरंगाबाद: बुधवारी औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची झालेल्या बैठकित जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, मार्च २०२० मध्ये खटुआ समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे प्रस्ताव दिला होता. यानुसार रिक्षाला पहिल्या टप्प्यात दीड किलोमीटरला २६ रुपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला १८ रुपये अशी सुधारणा करण्यात आली. पेट्रोलचे दर ७८ रुपये असताना व आजच्या पेट्रोलच्या दराची तुलना करता ४५ टक्के दरवाढ […]

अधिक वाचा..

…म्हणून शासकीय भूखंडात बांधली स्मशानभूमी

अहवाल सादर करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतला आदेश शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे स्मशानभूमी नसताना देखील जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे असलेल्या जमिनीत स्मशानभूमी बांधल्याची घटना समोर आली असल्याने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील जमीन गट नंबर ४२/५०/५८९ मधील प्लॉट […]

अधिक वाचा..