जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी केला बसने प्रवास

मुख्य बातम्या

शिक्रापूर ते कोरेगाव प्रवासात केली समाज बांधवांची विचारपूस

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणेफाटा येथील 1 जानेवारी या शौर्यदिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेत शिक्रापूर व लोणीकंद येथे स्वतंत्र पार्किंग करुन समाजबांधवांना बसने विजयस्तंभ येथे घेऊन जाण्यात येत असताना चक्क जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी बसमधून प्रवास करत समाज बांधवांची विचारपूस केली आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत असताना शेकडो बसेस ची व्यवस्था समाज बांधवांसाठी करण्यात आलेली असताना सदर व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बस मधील प्रवाशी असलेल्या समाज बांधवांशी चर्चा करत त्यांना मिळालेल्या सुविधांबाबत विचारपूस केली असता प्रशासनाने केलेली सुविधा अतिशय चांगली असल्याचे अनेक समाजबांधव प्रवाशांनी सांगितले.