शिरुर तहसिल कार्यालयात कलेक्टर आले रे आले …

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात कलेक्टरसाहेब कार्यालयीन तपासणी शनिवार (दि. ७) रोजी येणार होते त्या आधीही महीनाभरापुर्वी ते येणार होते. त्यामुळे तहसिल कार्यालयात मोठी जय्यत तयारीही झाली होती. सगळीकडे साफसफाई होऊन विविध संकलनाची पुर्वतयारीही झाली होती.

तलाठी, मंडल आधिकारी, कर्मचारी यांची याबाबत बैठक होऊन दत्पर तपासणीची तयारीही झाली होती. अनेक नागरीकांची गेली अनेक दिवसांपासून विविध संकलनाची कामे रखडल्याने विविध समस्या मांडण्यासाठी ते कलेक्टर साहेबांची आतूरतेने वाट पाहत होते. परंतू दुसऱ्यांदाही साहेब न आल्याने आलेल्या खातेदारांची घोर निराशा झाली असून त्यांच्या कामांसाठी शिरुर कार्यालयाला कुणी तहसिलदार देता का तहसिलदार, अस म्हणण्याची वेळ आली असून शिरुर शिवसेनेने चक्क प्रभारी तहसिलदारांऐवजी पुर्णवेळ तहसिलदार दाखवा २१,००० रु. मिळवा, असे बक्षिस ही ठेवले आहे.

तत्कालीन तहसिलदार यांनी आपल्या पाठीमागे लागलेले ग्रहण (भ्रष्टाचार केल्याने तक्रारी अर्ज नागरीकांनी केल्याने) जाण्यासाठी अंधश्नद्धेपोटी या कार्यालयाला चक्क बोकडाचा नैवेदय दाखवला होता. तो बोकड त्यांना पावला नसून तेव्हापासून अदयापपर्यंत पुर्ण वेळ तहसिलदार या कार्यालयाला मिळाला नाही.