औरंगाबादकरांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रिक्षा भाडे दरवाढीस मंजुरी..

महाराष्ट्र

औरंगाबाद: बुधवारी औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची झालेल्या बैठकित जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, मार्च २०२० मध्ये खटुआ समितीच्या शिफारशीनुसार शासनाकडे प्रस्ताव दिला होता. यानुसार रिक्षाला पहिल्या टप्प्यात दीड किलोमीटरला २६ रुपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला १८ रुपये अशी सुधारणा करण्यात आली. पेट्रोलचे दर ७८ रुपये असताना व आजच्या पेट्रोलच्या दराची तुलना करता ४५ टक्के दरवाढ होणे अपेक्षित होते. मात्र नागरिकांचा विचार करता २३ टक्के दरवाढ झाली आहे. आता शहरातील ९६ मार्ग निश्चित केले असून या ठिकाणी शेअरिंग रिक्षा थांब्याचे बोर्ड सीएसआर फंडातून लावण्यात येणार आहेत.

मागील आठ दिवसांपासून रिक्षाचालक संघटनेकडून रिक्षा भाडेवाढ करण्याची मागणी सुरू हाेती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ही मागणी मान्य करत रिक्षाचे भाडे दीड किलोमीटरला २६ रुपये तर पुढे प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली. शेअरिंग रिक्षासाठी प्रत्येकी तीन प्रवाशांसाठी ३० टक्के दरवाढ लागू असेल. याआधी २०१५ मध्ये किमी अंतरासाठी १४ रुपये तर पुढील प्रत्येक किमीसाठी १४ रुपये दरवाढ झाली हाेती.

२ ऑक्टोबरपासून ६० दिवसांच्या आत रिक्षाचालकांना नवे कॅलिब्रेटर मीटर बसवावे लागतील. त्यासाठी ९ ठिकाणी सेंटर उघडले जाणार असून तोपर्यंत त्यांना ट्रॅफिक कार्ड दिले जातील. यासोबतच रिक्षाचालकांना गणवेश घालणे अनिवार्य असेल. पार्किंग नसलेल्या ठिकाणी रिक्षा पार्क करता येणार नाही. प्रवासी भाडे नाकारता येणार नाही.