वाट चुकलेला चिमुकला महिला दक्षता समिती आणि पोलिसांमुळे वडिलांकडे सुखरुप परतला…

शिरुर (तेजस फडके): स्थळ… शिरुर येथील पुणे-नगर बाह्यवळण महामार्ग… साधारण सहा वर्षांचा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत रस्त्याने चाललेला. तेवढ्यात काही सामाजिक कार्यकर्त्यांची नजर या चिमुकल्यावर पडते. मग ते त्याच्या जवळ जाऊन त्याची विचारपुस करतात. पण हा लहानगा घाबरलेला असल्याने स्वतःच नाव किंवा वडिलांच नाव काहीच सांगत नाही. मग ते सामाजिक कार्यकर्ते त्याला उचलून घेतात […]

अधिक वाचा..

शरद पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा समितीने केला नामंजूर…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते समितीने नामंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी आदरणीय शरद पवारसाहेब कायम रहावेत हीच समितीच्या सदस्यांची सामुहिक भावना आहे त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करुन शरद पवारसाहेबांनी राजीनामा परत घ्यावा […]

अधिक वाचा..

शिरुर महिला दक्षता समितीच्या वतीने पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचा सन्मान

महाराष्ट्र पोलिस दलात सतत 28 वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालक पदक शिरुर (तेजस फडके): शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना पोलिस महासंचालक पदक मिळाल्याने शिरुर पोलिस स्टेशनच्या महिला दक्षता समितीच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी अनेक गुन्ह्यात स्वतः लक्ष घालून गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच […]

अधिक वाचा..

लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे; नीलम गोऱ्हे

मुंबई: विधान मंडळाच्या सभागृहात आलेले लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केले. लोकपाल विधेयकाबाबत आज आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासण्यासाठी देण्यात येईल. ही […]

अधिक वाचा..

खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार

मुंबई: विना अनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांवर अवलंबून असते. शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढविताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेबरोबरच चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येतो. मात्र, राज्य शासनाचे नियंत्रण रहावे तसेच या शाळांमधील शुल्क नेमकी किती असावे याबाबत एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशन आणि महिला दक्षता समितीच्या वतीने ऑनलाईन फसवणूकीबाबत मार्गदर्शन

शिरुर (किरण पिंगळे): सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असुन यामध्ये अनेक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन एखादी वस्तु खरेदी करण्यापेक्षा मोबाईलवर दिसणाऱ्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट वरुन घरबसल्या वस्तु खरेदी करणाऱ्याकडे सगळ्यांचा कल वाढला असुन सर्वात जास्त महीला याला बळी पडत आहेत. त्यामुळे घरात बसून ऑनलाईन वस्तु खरेदी करत असताना त्या फसल्या […]

अधिक वाचा..

पतसंस्थांचे कामकाज पारदर्शकपणे चालण्यासाठी तज्ञ समिती नेमा; बाळासाहेब थोरात

मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेत पतसंस्थांचा मोठा वाटा राहिला आहे. ही पद्धत पुढे जात असतांना या क्षेत्रात अनेक नवीन प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. बँकेचे चेअरमन, मॅनेजर हे काही निर्णय परस्पर घेत असतात, संचालक मंडळाला याबाबत कोणतीही कल्पना नसते. कल्पना नसतांना व माहिती नसतांना अनवधानाने ते प्रस्तावावर सह्या करतात व नंतर न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतात अशी परिस्थिती […]

अधिक वाचा..

ज्यांनी हक्कभंग दाखल केला ते वादी असतात तेच समितीत हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही

मुंबई: विधीमंडळात ज्यांनी खासदारांच्या वक्तव्यावर हक्कभंग दाखल केला त्याच सदस्यांना हक्कभंग समितीमध्ये घेण्यात आले हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नसल्याने ही समिती पुनर्गठीत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार केली. विधानसभेचे कामकाज खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून बुधवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. आज सभागृह सुरू होताच […]

अधिक वाचा..

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलकांशी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साधला संवाद

सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची दिली ग्वाही मुंबई: संसदीय कार्य मंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज आझाद मैदान येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच समितीच्या सदस्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद घडवून आणला. […]

अधिक वाचा..

राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश…

मुंबई: राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले. अमरावती जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करण्याचा निर्णय शासनाने यापुर्वीच घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी […]

अधिक वाचा..