shirur-firing

Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात रात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसांनी एका सेवानिवृत्त सैनिकासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 5 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास राजेश लंघे यांच्या घरासमोर ही गोळीबाराची घटना घडली आहे. मुंबईहून आपल्या मूळ गावी आलेल्या या मंडळींनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले […]

अधिक वाचा..
waghale-dp

शिरूर तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढले; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…

शिरूर : शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या डीपी (डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर) चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच तीव्र उन्हाळा आणि पाण्याची टंचाई यामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजासमोर आता डीपी चोरीचे नवे संकट उभे ठाकले आहे. वाघाळे येथे कॅनलवरील डीपी चोरीला… वाघाळे येथील गट क्रमांक 100 […]

अधिक वाचा..
dead

शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील राजस्थान ढाबा परिसरात घडलेल्या एका भीषण अपघातात ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रक चालकाविरुद्ध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

नाशिकच्या भोंदूबाबासाठी शिरूरच्या नेत्याने खर्च केले करोडो रुपये; महागडी गाडी, परदेश दौरा अन् बरंच काही…

शिरूर (तेजस फडके): राज्यात सध्या नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाची चर्चा आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिनेश परब याने 22 डिसेंबर 2025 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी अशोक खरात […]

अधिक वाचा..
sand-mafia

Video! सर्कल ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर वाळू माफियांचा ‘रात्रीचा खेळ’; प्रशासन मौन, कारवाई कधी?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील टाकळी भिमा-म्हाळुंगी डॅम परिसरात वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वडगाव बांडे सर्कल ऑफिसच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा सारा सावळागोंधळ सुरु असूनही प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नदीपात्राची होत असलेली लूट आता उघडपणे सुरु असल्याने नागरिकांमध्ये […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी…

शिरूर (तेजस फडके) : नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. त्याच अशोक खरात सोबत शिरुर तालुक्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याच खरातने दोन महिन्यांपुर्वी ‘त्या’ पुढाऱ्यासह एक जणावर नाशिक […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर! खैरेनगर आणि केंदूर परिसरात पिकअप वाहनातून यायचे अन् लुटायचे…

शिरूर : शिरूर तालुक्यातील खैरेनगर आणि केंदूर परिसरात पिकअप वाहनातून येऊन, घराचे दरवाजे तोडून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका सराईत दरोडेखोर टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टोळीतील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचे २ आणि जबरी चोरीचे ३ असे एकूण ५ गंभीर […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

Video: शिरूर तालु्क्यातील चिमुकल्याची समलिंगी संबंधाच्या विरोधामुळे हत्या? एक ताब्यात…

शिरूर : शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे चिडून नराधमाने साईराजचा काटा काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस संशयित आरोपीची कसून चौकशी करत असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर हत्येचे नेमके गूढ उकलणार आहे. सदर मृत्यू हा […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

Video! शिरूर तालुका हादरला! चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; घटनाही अगदी तशीच…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मुलाच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीड वर्षांपूर्वी तशीच घटना […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण…

शिरूर : जमिनीच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादातून सावत्र मुलाने आपल्याच वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे घडली आहे. मुलासोबतच त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही सहभाग घेतल्याने परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित कुटुंबात जमिनीच्या वाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. वृद्ध महिला हक्काच्या जमिनीसाठी मागणी […]

अधिक वाचा..