vaishnavi-jamkar-lonikand

लोणीकंद येथील ‘वैष्णवी’ने सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच संपवलं जीवन…

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यात युवतीने आपलं जीवन संपवल्यामुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या केलेल्या विवाहीत युवतीचे नाव आहे. सासरच्या लोकांकडून, छळ करत पैशाची मागणी करण्यात येत असल्याने वैष्णवीने घरातच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, मुलीच्या कुटुंबीयांकडून दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू-सासरा […]

अधिक वाचा..

शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यात उघडकीस आलेल्या हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या रॅकेट मधून लाईफ केअर हॉस्पिटलचा सर्वेसर्वा डॉ. आकाश सुभाष मलगुंडे (रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्यासह एजंट नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) करोडो रुपयांची ‘माया’ कमविल्याची ढोकसांगवी सह परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु […]

अधिक वाचा..

कट मारल्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; महिलेसह दोन अल्पवयीनांवर गुन्हा

पुणे: शहरातील कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी चालवताना ‘कट’ मारल्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत. या घटनेमुळे भाग्योदयनगर परिसरात काही काळ खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी […]

अधिक वाचा..

शिरूर! ‘सुलभ’ भिशी घोटाळा प्रकरणात संशयाचे सावट झाले गडद…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेल्या कथित ‘सुलभ’ भिशी घोटाळ्याने दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण केले असून या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नागरिकांकडून तक्रार अर्ज दाखल होऊनही अद्याप गुन्हा नोंदवला गेलेला नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होणार का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गर्भलिंग तपासणीसारख्या कायद्याने पूर्णपणे बंदी असलेल्या घृणास्पद प्रकाराला शिरुरमध्ये आता हायटेक रूप मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे ‘गर्भलिंग निदान’ करुन देणाऱ्या रॅकेटचा आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या […]

अधिक वाचा..
sand-mafia-shirur

शिरूर! घोड धरणात सहा वेळा बोटी फोडूनही वाळू माफिया मोकाटच; दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरु…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणात राजरोजपणे दिवसाढवळ्या बेकायदेशीर अवैध वाळू उपसा सुरुच आहे. शिरुर आणि श्रीगोंदा महसूल विभागाने सहा वेळा संयुक्त कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी फोडल्या. मात्र, या सर्व कारवायांनंतरही एकाही वाळू माफियावर गुन्हा दाखल न झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील एका गर्भलिंग निदान करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरूर तालुक्यात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन करून मोबाईल ॲपच्या सहाय्याने गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंटवर कठोर […]

अधिक वाचा..
shirur-accident

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर तिघे जखमी…

शिरूर (सुनिल जिते): मलठण रस्त्यावरील आमदाबाद फाट्याजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे तेथील नागरिक सांगत आहे.   View this post on Instagram   A […]

अधिक वाचा..
shirur-accident

शिरूर तालुक्यात भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी…

शिरूर (नितीन थोरात) : शिरूर-राजगुरुनगर मार्गावर आज (सोमवार) दुपारी सुमारे चारच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात आमदाबाद हद्दीतील माशेरे मळ्याजवळ घडला असून, या दुर्घटनेत दुचाकीवरील पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवर (MH14 EZ1239) एक पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुले असा पाच […]

अधिक वाचा..

पुण्यात स्पा व लॉजवर धाड; ६ महिलांची सुटका, पीटा कायद्यानुसार गुन्हे दाखल

पुणे: पुणे शहरात देहव्यापार करणाऱ्या स्पा सेंटर आणि लॉजवर अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाने मोठी कारवाई करत सहा महिलांची सुटका केली आहे. विशालनगर, निगडी आणि आळंदी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून संबंधित स्पा व लॉज चालकांवर पीटा (अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशालनगर येथील इंटर्नल फॅमिली स्पा येथे वाकड पोलिस […]

अधिक वाचा..