शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मुलाच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीड वर्षांपूर्वी तशीच घटना घडली होती. यामुळे संशय निर्माण केला जात आहे. मुलाच्या कुटुंबियांनी तपास झाल्याशिवाय अंत्यसंस्कार केले जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
शिरुर तालुक्यात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; मात्र अधिकारी म्हणतात…
मृत साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी, वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सर्व बाजूनी तपास केला जात आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, साई मांजरे हा मुलगा शाळेमधून घरी आल्यानंतर कपडे बदलून खेळायला गेला होता. त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह शेतात सापडला. दहिवडी (ता. शिरूर) गावातील मांजरे वस्तीत ही घटना घडली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या घटनेने ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. साईचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला, त्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे ही हत्या असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच दहिवडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेचा पूर्ण उलगडा होत नाही आणि तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. जोपर्यंत दोषींना पकडले जात नाही, तोपर्यंत पोलिस प्रशासनाला सहकार्य करणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
शिरूर तालुक्यात वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण…
शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?
शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…