vaishnavi-jamkar-lonikand

लोणीकंद येथील ‘वैष्णवी’ने सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच संपवलं जीवन…

क्राईम

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यात युवतीने आपलं जीवन संपवल्यामुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या केलेल्या विवाहीत युवतीचे नाव आहे.

सासरच्या लोकांकडून, छळ करत पैशाची मागणी करण्यात येत असल्याने वैष्णवीने घरातच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, मुलीच्या कुटुंबीयांकडून दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू-सासरा आणि नवऱ्याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृ्त्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र, या आत्महत्याप्रकरणामुळे पु्न्हा एकदा पिंपरीतील वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणीकंद पोलिसांनी तिचे पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुंडा प्रतिबंधक कायद्यासह छळाच्या विविध कलमान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचे मृत्यूप्रकरण राज्यभरात चर्चेत आले होते. वैष्णवीने आत्महत्या केल्याचं सुरुवातीला समोर आले होते. पण, त्यांच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा सापडल्या आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी वैष्णवी यांचा हुंड्यासाठी छळ होत असून तिची हत्या केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलिसांनी फरार सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंसह हगवणे कुटुंबातील संबंधितांना अटक केली होती. या घटनेने, पुन्हा एकदा हुंडाबळीचा विषय राज्यभर चर्चेत आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

बारामतीत २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

भर वर्गात गोळीबार! विद्यार्थिनीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

पाबळ हादरले! घरगुती वादातून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

पोलीस महिलेच्या मुलीने केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी