पुणे जिल्ह्यात अजब चोरी! मेडिकल फोडून चोरले फक्त कंडोम अन्…

क्राईम

पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकणमधील खराबवाडी परिसरात असलेल्या एका मेडिकलमध्ये झालेल्या चोरीची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. चोरांनी चक्क मेडिकल फोडलं आणि पैसे चोरण्याऐवजी कंडोम, झंडू बाम आणि चॉकलेटवर डल्ला मारला आहे. मात्र, या चोरीची चर्चा आता संपूर्ण राज्यभरात होत आहे, कारण चोरट्यांनी दुकानातील महागड्या औषधांना हातही न लावता चक्क कंडोम, कॅटबरी आणि झंडू बामचे बॉक्स चोरून नेले आहेत.

खराबवाडी येथील ‘माही मेडिकल’मध्ये सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पहाटेच्या वेळी चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटले आणि आत प्रवेश केला. दुकानात शिरल्यानंतर चोरट्यांनी महागडी औषधं किंवा इतर मौल्यवान वस्तू शोधण्याऐवजी कंडोमचे पाकीटं, चॉकलेट्स आणि झंडू बामचे बॉक्स गोळा करण्यावर भर दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

चोरट्यांची ही अजब कृती दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. चोरटे दुकानातून रोकड घेऊन गेलेच, पण सोबत नेलेल्या या ‘विचित्र’ वस्तूंमुळे ही चोरी आता चर्चेचा विषय ठरली आहे. दुकानाचे मालक जेव्हा सकाळी आले, तेव्हा त्यांना शटर उचकटलेले दिसले आणि चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चाकण पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, औद्योगिक परिसरात अशा प्रकारे दुकाने फोडण्याचे सत्र वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शिरुरमध्ये वादळी पावसाचा तडाखा; एक्सप्रेस फिडरच्या तारा तुटल्याने रांजणगाव MIDC तील पाणी पुरवठा ठप्प

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी; लाखो रुपयांचे दागिने लंपास…

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत