Shirur Police Station

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) पिंपरखेड (ता.शिरुर) येथील ‘हॉटेल विसावा’ च्या मॅनेजरला एक लाख रुपये दे अशी मागणी करत ते देण्यास नकार दिल्याने मॅनेजरवर धारदार कोयत्याने डोक्यात व हातावर जीवघेणा हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकावर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हॉटेल मॅनेजर हरेश ठकाजी चोरे (वय४५) रा. जांबुत ता.शिरुर, जि.पुणे […]

अधिक वाचा..

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

न्हावरे (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील उरळगाव येथे सन २०१९ साली शेतातील बांधावरील रस्त्यावरुन ट्रॅक्टर घेवुन गेल्याबाबत जाब विचारल्याने विनोद चंद्रकांत होलगुंडे आणि त्याच्या इतर ६ साथीदारांनी चिडुन जावुन सागर रसिक होलगुंडे याला जिवे ठार मारण्याच्या उ‌द्देशाने डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच सागरच्या नातेवाईकांनाही मारहाण केली होती. त्यानंतर विनोद होलगुंडे हा पाच वर्षे फरार […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात युवकाला कोयत्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

कारेगाव (तेजस फडके) येथे किरकोळ वादातुन एका व्यक्तीने बाजारात पायी चाललेल्या युवकाच्या पाठीमागुन कोयत्याने मारहान करत दुखापत केली. तसेच स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो युवक पळुन जाऊ लागल्याने त्याला कोयता फेकुन मारल्याची गंभीर घटना शनिवार (दि २९) रोजी घडली असुन याबाबत अक्षय रामदास शिवले याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने निखिल रामचंद्र वीडगीर याच्यावर गुन्हा […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात पोलिसांची दबंगगिरी; पाच पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करत दोघांना ठोकल्या बेड्या…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरांतील पुणे-नगर महामार्गावर ‘दि नाना स्पॉट’ हॉटेल जवळ दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करुन झाडाझडती घेताच त्यांच्याकडे पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. अनिकेत विलास गव्हाणे (वय २० रा. गव्हाणवाडी, गोपाळवस्ती ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) तसेच मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २० रा. जवळा, ता. […]

अधिक वाचा..
crime

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीचा खुन झाला. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे मयताच्या भावाच्या तक्रारीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू हा डोक्यात मार लागल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.   रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील एका गावातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवत स्वतःच्या चारचाकीतुन टाकवे (ता.मावळ, जि.पुणे) येथे घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे सोनाई मंडल (रा.पश्चिम बंगाल सध्या रा. टाकवे ता. मावळ जि.पुणे) या परप्रांतीय आरोपीवर बाललैंगिक अत्याचार (पोस्को) तसेच बलात्काराचा […]

अधिक वाचा..

शिरुर येथे पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पुणे-नगर हायवेवर हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात वाहणाने दुचाकीला धडकेत प्रमिला देवराव राठोड (वय ४४) या महिलेचा मृत्यू झाला असुन त्यांचा मुलगा राम देवराव राठोड (रा.चिखलीतांडा, ता किनवट, जि.नांदेड) सध्या रा. हिंजवडी चौक पुणे हा जखमी झाला आहे. याबाबत राम देवराव राठोड यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

करडे येथे ट्रॅक्टर व हायवा कंपनीत लावली नसल्याने काठी व हॉकीस्टीकने कंपनीच्या मॅनेजरला जबर मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) करडे (ता. शिरुर) येथील प्राईमकोल्ड स्टोरेज प्रा. लि. कंपनीमध्ये ट्रॅक्टर आणि हायवा गाडी कंपनीमध्ये न लावल्याचा राग मनात धरून चार जणांनी कंपनीचे मॅनेजर श्रीकांत शिवाचरण साहू याला काठी व हॉकी स्टिकने जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी १ ) अमोल विलास देशमुख २) प्रणव राजेंद्र जगदाळे ३) अमोल नितीन देवरे व इतर अनोळखी […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महीलेस शिवीगाळ, मारहाण करुन पार्लर जाळुन टाकण्याची दिली धमकी…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालविणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेच्या ब्युटीपार्लर मध्ये प्रवेश करत ‘तुझ्यामुळे आमच्या घरात भांडण होत आहेत’ असे म्हणत सदर महिलेला अश्लील तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करुन ब्युटी पार्लर जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्या सतिश शिंदे या व्यक्तीच्या विरोधात शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर शहरात ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा गजाआड पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप यांची दंबंग कामगिरी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरामधील पोद्दार पार्कीगमध्ये मध्ये उभ्या असलेल्या चार ट्रकच्या (दि १७) ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री तब्बल सात बॅटऱ्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या होत्या. यामुळे शिरुर शहरामध्ये खळबळ माजली होती. शिरुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप यांनी या चोरी बाबत तपास सुरु केला असता तांत्रिक विश्लेषण व […]

अधिक वाचा..