कोल्हापूरच्या राजचं आगमन ही गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा, एकात्मता, संस्कृतीचा मोठा उत्सव

कोल्हापूर: कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्र मंडळाच्या ‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागल्याची, भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. ‘कोल्हापूरचा राजा’ ही संकल्पना २०१२ मध्ये मंत्री. डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरु झाली. २०१२ मध्ये त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेशमुर्ती गोल […]

अधिक वाचा..

मराठी भाषा व संस्कृती संपवण्यासाठीच हिंदीची सक्ती, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडा हाणून पाडू

मुंबई: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपाला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. […]

अधिक वाचा..

हिंदीची सक्ती करून मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव, हिंदी भाषेची सक्ती रद्द करा

मुंबई: मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

बेट भागात यात्रा-जत्रांचे उत्सव सुरू, श्रद्धा आणि संस्कृतीचा अनोखा संगम

शिरूर (अरुणकुमार मोटे):  शिरूर तालुक्यातील बेट भाग सध्या धार्मिक आणि सांस्कृतिक रंगांनी न्हालेला आहे. एप्रिल महिना आला की या भागातील गावोगावी पारंपरिक थाटामाटात यात्रा-जत्रांचे आयोजन केले जाते. गावकऱ्यांच्या उत्साहात आणि बाहेरगावी असलेल्या लोकांच्या मोठ्या उपस्थितीत या यात्रांचा उत्सव सर्वदूर दुमदुमत असतो. या यात्रांमध्ये देव जन्माचे कीर्तन, बैलगाडा शर्यती, तमाशा, ऑर्केस्ट्रा, कुस्त्यांचे जंगी आखाडे अशा विविध […]

अधिक वाचा..

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला; वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

मुंबई: वाचनाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया” च्या सहयोगाने दि.५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू.), तिसरा मजला, शारदा मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (दि. ५) फेब्रुवारी रोजी सकाळी […]

अधिक वाचा..

आदिवासी संस्कृती संपवण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा; नाना पटोले

मुंबई: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, त्यातील ५५ वर्ष केंद्रात काँग्रेसची सत्ता राहिली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना आदिवासी समाजावर अत्याचार होऊ दिले नाहीत पण भाजपा सरकारच्या काळात मात्र मणिपूर असो वा महाराष्ट्र सर्व भागात अत्याचार वाढले आहेत. आदिवासीच या देशाचा मुळनिवासी आहे, जल, जमीन जंगलवर त्यांच्याच अधिकार आहे परंतु आदिवासींची ही संस्कृतीच संपवण्याचे पाप […]

अधिक वाचा..
sharad pawar

समाजात वाचनसंस्कृती किती रुळली त्यावर त्याच्या सांस्कृतिक पातळीची उंची  ठरते; खासदार शरद पवार

मुंबई: एखाद्या समाजात वाचनसंस्कृती किती रुळली आहे त्यावर त्याची सांस्कृतिक पातळी किती उंचीची ते ठरते” असे विचार संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खा शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ दादर येथील संस्थेच्या शारदा मंगल सभागृहात थाटात संपन्न झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंदीतील […]

अधिक वाचा..

हिंदू मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन;  प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर परिसरातील हिंदू मुस्लीम बांधव एकोप्याने राहून सर्व सन उत्सव साजरे करत असल्याची बाब कौतुकास्पद असून हिंदू मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होत असल्याचे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी व्यक्त केला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जामा मस्जिदमध्ये मुस्लीम बांधवाच्या पवित्र अशा रमजान महिन्यातील रोजे निमित्त शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

शिक्षणाबरोबर नैतिक मूल्य, संस्कृती,संस्कारक्षम शिक्षण असणे आवश्यक

मुंबई: देशाच्या प्रगतीला अधिक गती देताना शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्य, संस्कृती, संस्कारक्षम शिक्षण असणे काळजी गरज आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. पनवेल येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट,कॉमर्स व विज्ञान महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव समारंभ कार्यक्रम संपन्न […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती धडे

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा येथे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबनराव पोतदार, भरत सुरसे व दिनेश देवकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्यानपर मार्गदर्शन केले असल्याने विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती धडे मिळाले आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा येथे नुकताच लेखक आपल्या […]

अधिक वाचा..