शिक्षणाबरोबर नैतिक मूल्य, संस्कृती,संस्कारक्षम शिक्षण असणे आवश्यक

महाराष्ट्र

मुंबई: देशाच्या प्रगतीला अधिक गती देताना शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्य, संस्कृती, संस्कारक्षम शिक्षण असणे काळजी गरज आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले.

पनवेल येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट,कॉमर्स व विज्ञान महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर महाविद्यालयचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी इतर मान्यवर उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणाले, देशाच्या विकासातील उच्च शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार केले. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. शिक्षणाची स्वायत्तता असली पाहिजे त्यानुसारच राज्यातील 144 महाविद्यालय आणि 22 विद्यापीठाला स्वायत्तता देण्यात आली आहे. शिक्षणात यापुढे 70 टक्के करियर विषयक अभ्यासक्रम आणि 30 टक्के इतर अभ्यासक्रमाचा समावेश असेल.

शिक्षण आणि उद्योग याचा समनव्य ठेवून नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी विदेशातील विद्यापीठ आणि राज्यातील विद्यापीठाच्या कुलगुरूची एकत्रित परिषद राजभवन येथे झाली. अनेक विद्यार्थी आपल्या राज्यात शिक्षणासाठी येत आहेत. देशातल्या उच्च शिक्षण प्रणालीत परिवर्तनात्मक सुधारणेचा मार्ग प्रशस्त करणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले. असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.