मुखईच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती धडे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा येथे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबनराव पोतदार, भरत सुरसे व दिनेश देवकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्यानपर मार्गदर्शन केले असल्याने विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती धडे मिळाले आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा येथे नुकताच लेखक आपल्या भेटीला उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबनराव पोतदार, भरत सुरसे व दिनेश देवकर यांनी शाळेला भेट दिली.

दरम्यान जेष्ठ साहित्यिक बबनराव पोतदार यांनी विद्यार्थ्यांना वाचते व्हा, वाचनाने जीवन सफल करता येते, मोबाईल पासून आता फारकत घेवून पुस्तकांशी नातं जोडावे, वाचनाचा फायदा जीवनात होत असतो म्हणून शालेय जीवनापासून वाचत रहा तसेच वाचन वाढवा असा सल्ला दिला, तर दिनेश देवकर यांनी विद्यार्थ्यांना आपण करिअर कसे निवडावे ते सिद्धीस कसे घेवून जावे.

करीअर निवडीचे जीवनातील महत्व अनेक उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले. तसेच भरत सुरसे यांनी कवितेतील प्रतिभा कशी असते जे ना देखे रवि ते देखे कवी या उत्तीप्रमाणे अनेक कविता कशा तयार करता येतात त्या कशा सुचतात याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले, दरम्यान सदर साहित्यिकांच्या वतीने शाळेला काही पुस्तके भेट देत वृक्षारोपन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सविता लिमगुडे यांनी केले तर प्रास्ताविक किशोर गोगावले यांनी केले आणि प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी आभार मानले.