त्यांची वर्षा बंगल्यावर दीड तास चर्चा, उपराष्ट्रपती पदाबद्दल काय निर्णय होणार…

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री वर्षा निवासस्थानी दीड तासाहून अधिक वेळ बैठक घेतली. या चर्चेत महायुतीतील समन्वय, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि मराठा आरक्षण आंदोलन यावर सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून महायुतीत समन्वयाचा अभाव जाणवत होता. मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे वातावरण ढवळून निघाले […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या ‘त्या’ निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट? अनेकांचे तडकाफडकी राजीनामे; कारण काय?

मुंबई: गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी करत राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरच्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला हीच बाब लक्षात घेता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशात डबघाईला आलेल्या काँग्रेसला बळकटी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. याअंतर्गत माजी मंत्री, […]

अधिक वाचा..

पालकमंत्र्यांची साथ अन्‌ मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला ‘हा’ निर्णय

सोलापूर: सोलापूर- मुंबई विमानसेवेतील प्रमुख अडचण राज्य सरकारने दूर केली आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर व्यावहारिक तूट निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) देण्यास आज (सोमवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकी मंजुरी देण्यात आली. यामुळे आता सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापुरात रोजगार येण्याकरिता शहरातून मुंबई, बंगळूर, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याची मागणी वारंवार होते. तसेच […]

अधिक वाचा..

CBSE चा महत्त्वाचा निर्णय, काय आहे ‘ओपन बुक’ पद्धत

मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नववीच्या परीक्षा Open Book पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या निर्णयानुसार, परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं, नोट्स आणि संदर्भ ग्रंथ सोबत ठेवण्याची आणि त्यांचा वापर करण्याची परवानगी असेल. या बदलामागे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. यापुढे केवळ पाठांतरावर भर […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय! आता ‘अशाप्रकारे’ होणार शेतीची हद्द निश्चिती

मुंबई: राज्य सरकारच्या विविध विभाग अंतर्गत अनेक महत्त्वाचे असे निर्णय सरकारच्या माध्यमातून सध्या घेण्यात येत आहेत. यामध्ये जर आपण बघितले तर राज्यातील महसूल विभाग वेगवेगळे समाज हितोपयोगी निर्णय घेण्यामध्ये सध्या आघाडीवर दिसत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना सेवा सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्यातील शिव पाणंद रस्त्यांचा निर्णय हा […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

मुंबई: निवडणूक आयोगाने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने देशातील 334 नोंदणीकृत पक्षाची मान्यता रद्द केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ राजकीय पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत. मान्यता रद्द करण्याचं कारण काय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मान्यता रद्द करण्यात आलेल्या पक्षांनी 2019 पासून कोणतीही […]

अधिक वाचा..

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा पहिला धक्का; अनेक बड्या कंपन्यांनी उत्पादन थांबवल…

मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. तामिळनाडूच्या तिरुप्पूरमधील अमेरिकेत निर्यात करणाऱ्या कापड कंपन्यांनी उत्पादन थांबवलं आहे. कापड कंपन्यांनी आता पर्यायी विचार करण्यास सुरुवात झाली आहे. कापड कंपन्यांनी उत्पादन थांबवल्याने कामगारांची बेरोजगारीची चिंता वाढली आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी भारतावर ५० टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर कंपन्या अमेरिकेला […]

अधिक वाचा..

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर दंडाचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डे घेतल्यास प्रति खड्डा ₹१५,०००/- दंड आकारण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ अन्यायकारक नव्हे, तर मुंबईतील लाखो गणेशभक्तांच्या श्रद्धेवर आघात करणारा आहे. मागील वर्षी हीच रक्कम ₹२,०००/- इतकी होती, ती सातपट वाढवून अचानक ₹१५,०००/- करणे म्हणजे गणेशोत्सवावर अडथळे निर्माण करणे होय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा निर्णय! ३४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी गारपीटसाठी अनुदान मंजूर

मुंबई: राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ च्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचं नुकसान झालं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांचे अनुदानास वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने एकूण ३४ जिल्ह्यातील ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांना अनुदान […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाचा शरद पवारांच्या नेत्याला झटका; ‘त्या’ निर्णयाला 4 दिवसांतच स्थगिती

पुणे: विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून evm मशीनबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या तब्बल 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ मतदान न मोजता मॉक पोलद्वारे मतदान मोजण्याचा पर्याय उमेदवारांसोबत ठेवला होता. मात्र, या विरोधात काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर उमेदवारांची […]

अधिक वाचा..