vote

शिरूर तालुक्यातील गट-गण जाहिर; कुठे खुशी.. कुठे गम…

राजकीय शिरूर तालुका

शिरूर : आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीकरिता शिरूर तालुक्यात एका जिल्हा परिषद गटासह दोन पंचायत समिती गण वाढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचा प्रारूप आराखडा सादर केला आहे.

शिरुर तालुक्यात पुर्वी सात गट व १४ गण होते मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नुकत्याच झालेल्या गट-गण रचनेत मोठ्याप्रमाणात ८ गट व १६ गण करण्यात तर आलेच मात्र हे करताना मोठ्याप्रमाणात गावांची आदलाबदल झाल्याने कुठ खुशी.. कुठे गम असे चित्र पाहण्यास मिळाले असले तरी गट-गण प्रसिध्द होण्याअगोदरच ब-यापैकी गट-गणांची मांडणी आधीच समजल्याने इच्छूकांची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. शिरुर तालुक्यात एकेकाळी जुन्या पुढा-यांचे उंबरठे तासनतास झिझविणा-या तत्कालीन तरुणांनी तालुक्यात झालेल्य्या पंचतारांकीत औद्योगीक वसाहत, कारखाने यांना लागणारा कच्चा माल, कुशल-अकुशल कामगार व लोखंडात सापडणारे स्क्रॅपरुपी सोने यामुळे स्वत:ची तर लाईफस्टाईल बदललीच त्याचबरोबर आपल्या सोबत विश्वासू कार्यकर्त्यांची फळी राहण्यासाठी कार्यकर्त्यांनाही कामे मिळवून देत तालुक्यात आर्थिक प्रगतीचे साधण्याचे तंत्र अवलंबले असतानाच गेल्या दोन वर्षापासुन या तरुणांनी आपापल्या कार्यक्षेत्रात क्रिकेटचे सामने, बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचे आखाडे, सामाजीक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.

शिरुर तालुक्यात पुर्वी शिक्रापूर-सणसवाडी, केंदूर-पाबळ, तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस, रांजणगाव गणपती-कारेगाव, शिरुर ग्रामीण-न्हावरा, टाकळी हाजी-कवठे येमाई, वडगाव रासाई-मांडवगण फराटा हे गट -गण अस्तित्वात होते. मात्र यावर्षी होणा-या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर टाकळी हाजी-कवठे येमाई, शिरुर ग्रामीण-निमोणे, कारेगाव -रांजणगाव गणपती, पाबळ-केंदूर, सणसवाडी-कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे -शिक्रापुर, न्हावरा निमगाव म्हाळुंगी, वडगाव रासाई-मांडवगण फराटा अशाप्रकारे गट-गणांची रचणा करताना केंदूर-पाबळ, शिक्रापूर, तळेगाव ढमढरे व न्हावरा-शिरुर सह रांजणगाव गणपती गटांची तोडफोड करीत न्हावरा-निमगाव म्हाळूंगी हा नव्याने गट-गण करण्यात आला आहे. काही इच्छूकांच्या तयारीवर पाणी फिरणार आहे. त्यातच शिरुर तालुक्यात आगामी बाजार समिती, घोडगंगा साखर कारखाना निवडणूकांमधूनही राजकारण ढवळून निघणार आहे.

४५ हजारांचे मताधिक्य टिकणार की भाजप करिश्मा साधणार
शिरुर तालुक्यात विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी ४५ हजारांच्या मताधिक्यांनी भाजपच्या बाबुराव पाचर्णे यांचा जरी पराभव केला असला तर राष्ट्रवादीत असणारे दोन गट व राष्ट्रवादी सोडून इतर पक्षांची आघाडी करण्याचा भाजपचा पवित्रा त्यामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी तालुक्यात निर्विवाद वर्चस्व राखणार की भाजप सर्वपक्षिय आघाडी साधण्याचा करिश्मा करित राष्ट्रवादीला खिंडीत गाठणार का याचीच चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

जिल्हा परिषद गटाचे नाव व त्यातील गण, गावनिहाय पुढीलप्रमाणे :
टाकळी हाजी- कवठे येमाई गट :
टाकळी हाजी गण :
काठापूर खुर्द, फाकटे, पिंपरखेड, जांबुत, शरदवाडी, वडनेर खुर्द, माळवाडी, टाकळी हाजी, साबळे वाडी, डोंगरगण, म्हसे बुद्रूक.
कवठे येमाई गण : कवठे येमाई, इचकेवाडी, मुंजाळवाडी, चांडोह, सविंदणे, रावडेवाडी, निमगाव दुडे, मलठण, लाखेवाडी.

शिरूर ग्रामीण- निमोणे गट :
शिरूर ग्रामीण गण :
शिरूर ग्रामीण, अण्णापूर, कर्डेलवाडी, सरदवाडी, करडे, आंबळे, कळवंतवाडी.
निमोणे गण : तर्डोबाचीवाडी, गोलेगाव, चव्हाणवाडी, मोटेवाडी, निमोणे, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वी.

कारेगाव-रांजणगाव गणपती गट
कारेगाव गण :
वरूडे, शिंगाडवाडी, वाघाळे, पिंपरी दुमाला, सोनेसांगवी, ढोकसांगवी, कारेगाव, आमदाबाद, निमगाव भोगी, चिंचोली मोराची, शास्ताबाद.
रांजणगाव गणपती गण : रांजणगाव गणपती, गणेगाव खालसा, खंडाळे, बुरुंजवाडी, पिंपळे खालसा, बाभूळसर खुर्द.

पाबळ-केंदूर गट
पाबळ गण :
पाबळ, कान्हूर मेसाई, थापेवाडी, फुटाणवाडी, माळवाडी, चौधरी बेंद, झोडगेवाडी, खैरेनगर, खैरेवाडी, मिडगुलवाडी, जातेगाव बुद्रूक, हिवरे.
केंदूर गण : केंदूर, थिटेवाडी, महादेववाडी, सुक्रेवाडी, पऱ्हाडवाडी, मुखई, करंदी, धामारी, जातेगाव खुर्द.

सणसवाडी-कोरेगाव भीमा गट
सणसवाडी गण :
दरेकरवाडी, डिंग्रजवाडी, सणसवाडी, पिंपळे जगताप, वाजेवाडी.
कोरेगाव भीमा गण : कोरेगाव भीमा, आपटी, वढू बुद्रूक, वाडा पुनर्वसन.

तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर गट
तळेगाव ढमढेरे गण :
तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, धानोरे.
शिक्रापूर गण : शिक्रापूर व राऊतवाडी.

न्हावरे-निमगाव म्हाळुंगी गट
न्हावरे गण :
न्हावरे, कोहकडेवाडी, रांजणगाव सांडस, राक्षेवाडी, आलेगाव पागा, अरणगाव, उरळगाव.
निमगाव म्हाळुंगी गण : दहिवडी, भांबर्डे, करंजावणे, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कोंढापूरी, कासारी.

वडगाव रासाई-मांडवगण फराटा गट
वडगाव रासाई गण :
वडगाव रासाई, कोळगाव डोळस, आंधळगाव, नागरगाव, कुरुळी, सादलगाव, शिरसगाव काटा, धुमाळवाडी, पिंपळसुटी.
मांडवगण फराटा गण : मांडवगण फराटा, फराटवाडी, इनामगाव, तांदळी, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रूक.