पाबळ हादरले! घरगुती वादातून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

पाबळ (सुनिल जिते): पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), […]

अधिक वाचा..

मुंबई निकालानंतर काँग्रेसमध्ये वाद! वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची भाई जगताप यांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून अपेक्षेपेक्षा कामगिरी सुधारली असली तरी सत्तेच्या समीकरणात पक्षाची भूमिका मर्यादित राहिली आहे. निकालानंतर काही तासांतच काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही […]

अधिक वाचा..

कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता काम केल्याने अधिकाऱ्यांवर माफी मागण्याची नामुष्की

सरदवाडी ग्रामस्थांच्या लढ्याला मोठे यश; अनिल जाधव यांचे प्रतिज्ञापत्र चुकीचे ठरले शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थ रामदास सरोदे व इतर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व एमआयडीसी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे झालेल्या सुनावणीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे. कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता […]

अधिक वाचा..

त्रिशंकू कौल दिल्यानंतर शिरूर नगर परिषदेत सत्तास्थापनेसाठी हालचाल

उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय खेळी रंगात; नेत्यांसोबत गुप्त बैठका, विजयी नगरसेवकांकडून पदांसाठी फिल्डिंग सुरू शिरूर (अरुणकुमार मोटे): बहुचर्चित शिरूर नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्यानंतर प्रत्येक पक्ष व प्रत्येक नगरसेवकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून, आता सत्तास्थापना, उपनगराध्यक्षपद निवड तसेच विविध विषय समित्यांच्या अध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना जोर आला आहे. विविध पक्षांचे नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये गुप्त […]

अधिक वाचा..

कावीळ झाल्यावर सपोर्टीव ट्रीटमेंट म्हणून खालील घरगुती उपाय अवश्य करावेत

कावीळ हा आजार एक धोकादायक आजार आहे ज्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर तो जीवघेणा देखील ठरू शकतो. कावीळचे विविध प्रकार आहेत पण आम्ही येथे कोणत्याही प्रकारच्या कावीळ वर केले जाणारे घरगुती उपाय सांगितले आहेत. हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न […]

अधिक वाचा..

खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याने अखेर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले फेर चौकशीचे आदेश 

टाकळीहाजी येथील आरोग्य केंद्रातील वैदयकिय आधिकाऱ्यांचे प्रकरण शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी निवासी राहत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नऊ गावांतील ग्रामस्थांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत होता याबाबत स्थानिक नागरीक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने विशेष चौकशी समिती नेमली होती. परंतु […]

अधिक वाचा..

महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करा

ठाणे: कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती कार्यरत असते. शासन निर्णय क्र.मकची-२०१४/ प्र.क्र.६३/ मकक दि.११ सप्टेंबर, २०१४ अन्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी खालीलप्रमाणे अनुभव असलेल्या व्यक्तींकडून […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत; आदित्य ठाकरे

मुंबई: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवायला पाहिजे होतं, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात 750हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ज्या विधानभवनात कृषी […]

अधिक वाचा..

जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत

मुंबई: विधानसभेत विरोधी पक्षाच्या २९३ अन्वये प्रस्तावावर चर्चा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवत धू धू धुतले. बाहेरच्या देशांनी सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले. जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..