शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, ही सक्षम आणि ज्ञानसमृद्ध समाजाच्या उभारणीची भक्कम पायाभरणी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत […]

अधिक वाचा..

मोदींच्या राजकीय भवितव्यावर राहुल गांधींचा दावा; राऊत म्हणाले, ‘१७ सप्टेंबरनंतर उलगडा होईल’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्याबाबत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याचा दावा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटल्याची माहिती समोर […]

अधिक वाचा..

MPSC पेपरफुटीचा आरोप; तरुणांच्या भवितव्याशी खेळ थांबवा, अन्यथा भाजपाला महागात पडेल; हर्षवर्धन सपकाळ

टीईटी, नीटनंतर आता ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका WhatsAppवर फिरल्याचा दावा; उद्योगबंदी आणि शालार्थ घोटाळ्यावरही सरकारवर हल्लाबोल  मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर आणि भाजपा सरकारवर जोरदार टीका करत MPSCच्या ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच WhatsAppवर फिरल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा केला. नीट आणि टीईटीनंतर आणखी एका पेपरफुटीच्या आरोपामुळे […]

अधिक वाचा..

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे, शिष्यवृत्ती, भत्ते आणि प्रशिक्षण योजनांमध्ये त्यांच्याच मुलांना डावलायचे, ही कोणती सामाजिक न्यायाची भूमिका आहे? राज्यातील सर्वात मोठा समाजघटक असलेल्या ओबीसी समाजाला योजनांच्या लाभात कायम दुय्यम स्थान का दिले जाते? जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक निधी […]

अधिक वाचा..

भविष्यातील वातानुकूलित ऑटो रिक्षा निर्मिती ही प्रवाशांची आरोग्य वाहिनी

एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण आणि बदलते हवामान लक्षात घेतले तर वातानुकूलित ऑटो रिक्षा ही केवळ सुविधा नसून भविष्यातील “आरोग्य वाहिनी” ठरू शकते. Mumbai Metropolitan Region मध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार यांसारखी वेगाने वाढणारी शहरे समाविष्ट आहेत. या संपूर्ण पट्ट्यात दैनंदिन प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी […]

अधिक वाचा..

रुबल नागी! झोपडपट्ट्यांतील मुलांचे भविष्य बदलणारी ‘ग्लोबल टीचर’

दुबई: जिद्द, चिकाटी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ असली तर नशिबाचे दरवाजे आपोआप उघडतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रुबल नागी. दुबईत (Dubai) आयोजित ‘जागतिक सरकार शिखर परिषदे’च्या (World Government Summit) व्यासपीठावर भारतातील झोपडपट्ट्यांतील शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी रुबल नागी यांचा ‘ग्लोबल टीचर प्राइज २०२६’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्काराची रक्कम तब्बल १० लाख […]

अधिक वाचा..

समृद्ध, सक्षम आणि संवेदनशील महाराष्ट्रासाठी भविष्यातील विकास आराखड्याची घोषणा

मुंबई: भविष्यातील महाराष्ट्र कसा असावा, याचा सविस्तर विकास आराखडा मांडण्यात आला असून “समृद्ध, सक्षम आणि संवेदनशील महाराष्ट्र” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा हा दृष्टिकोन असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या आराखड्यात सर्वसमावेशक व लोककेंद्रित विकास हा प्रमुख मुद्दा असून, विकासाचा लाभ शेवटच्या […]

अधिक वाचा..

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग

मुंबई: बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत, राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक […]

अधिक वाचा..

विधानपरिषद सभागृहातील संघर्ष, विचार आणि निर्णयांचा ठेवा पुस्तकातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वरिष्ठ सभागृहातील चर्चांमधून कायद्यांना मिळाले वैचारिक बळ; ऐतिहासिक ग्रंथ ठरणार मार्गदर्शक  नागपूर: भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून या ऐतिहासिक सभागृहाच्या शंभर वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण कायदे, ठराव व धोरणांचा दस्तऐवज म्हणून संदर्भसमृद्ध द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन आज नागपूर येथील विधानपरिषद सभागृहात करण्यात आले. वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या *“विधानपरिषदेने […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यांना सरकार रोजगार देणार का

नागपूर: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था असा आक्रमक सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नात वडेट्टीवार म्हणाले, […]

अधिक वाचा..