राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समारोप झाला. २४ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या शिबिरात राज्यातील जिल्हाध्यक्षांना संघटनात्मक कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. राहुल गांधी यांचे बुधवारी सकाळी ओझर […]

अधिक वाचा..

शिल्पकलेतील आधुनिक तंत्रज्ञान अन् व्यावसायिक संधींवर मार्गदर्शन; १५० हून अधिक विद्यार्थी-शिल्पकारांचा सहभाग

पुणे : ‘संघटित शिल्पकार संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान आणि ‘स्टुडिओ व्हिजिट’चे आयोजन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या १५० हून अधिक विद्यार्थी आणि शिल्पकारांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात कांदिवली येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध शिल्पकार आणि संघटित शिल्पकार संघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय चंद्रजीत यादव यांना भावपूर्ण मानवंदना […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक कारवाई सुरू केली आहे. एका दिवसातच पोलीस पथकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई करून ३७ हजार रुपये दंड वसूल केले आहेत. या कारवाईमुळे शहरात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती निर्माण झाली असून नियमभंग […]

अधिक वाचा..

ग्राहक सप्ताहानिमित्त मलठण येथे विविध विषयांवर मार्गदर्शन

शिरूर (अरुणकुमार मोटे): राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, तहसील कार्यालय शिरूर आणि ग्राहक पंचायत संस्था, पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत ग्राहक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्राहक सप्ताहातील दुसरे पुष्प शुक्रवार (दि. १९) रोजी सकाळी ११ वाजता रयत शिक्षण संस्थेच्या न्यू […]

अधिक वाचा..

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५१ व्या अभ्यासवर्गात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

संसदीय आयुधे म्हणजे जनतेशी थेट दुवा साधण्याची साधने; डॉ. नीलम गोऱ्हे नागपूर: राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) आयोजित ५१व्या संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना “संसदीय आयुधे आणि लोकशाही प्रणालीमध्ये त्यांचे महत्व” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, संसदीय आयुधे ही केवळ विचार मांडण्याची साधने नसून लोकशाही […]

अधिक वाचा..

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय; संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई: ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या हितासाठी खरीप हंगाम नियोजन बैठक उत्साहात पार; आमदार माऊली कटके यांचे मार्गदर्शन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेती विभागाने अधिक गतिशीलतेने काम करावे, असे आवाहन आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी केले. शिरूर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात आज सकाळी 10 वाजता खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक तालुका कृषी अधिकारी शिरूर व हवेली आणि पंचायत समिती शिरूर व हवेली […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाचा कारभार अधिक प्रभावी व गतिमान करणार

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. डॉ. राजेश देशमुख हे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वं, कुशल मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान प्रभावी करण्यावर आपला भर असेल, असे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शेतकऱ्यांना खरीप हंगामात करण्यात येणाऱ्या शेतीसह विविध योजनांची माहिती देत कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे शेतकऱ्यांसाठी खरीप पूर्व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी सहाय्यक अशोक जाधव, कृषी मित्र तानाजी राऊत, प्रगतशील शेतकरी भरत म्हेत्रे, गोपीचंद राऊत, संपत […]

अधिक वाचा..

कवठे येमाईत प्रवेश परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे होणार मार्गदर्शन

शिरुर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील मुलांना NEET, JEE, MHT-CET इ. परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरात जावे लागते. शहरात राहण्याचा तसेच परीक्षांच्या तयारीचा खर्च खुप मोठा असतो. प्रत्येक पालकाला हा खर्च झेपावत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. हीच गरज ओळखून कवठे येमाई येथील युवक सुरेश गायकवाड याने ओळखून ह्या सुविधा अतिशय मोफत दरात देण्याचे […]

अधिक वाचा..