शिक्रापुरात शेतकऱ्यांना खरीप पूर्व मार्गदर्शन

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शेतकऱ्यांना खरीप हंगामात करण्यात येणाऱ्या शेतीसह विविध योजनांची माहिती देत कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे शेतकऱ्यांसाठी खरीप पूर्व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी सहाय्यक अशोक जाधव, कृषी मित्र तानाजी राऊत, प्रगतशील शेतकरी भरत म्हेत्रे, गोपीचंद राऊत, संपत राऊत, खंडेराव खरपुडे, लक्ष्मण राऊत, राजेंद्र राऊत, कारभारी भूमकर, दशरथ राऊत, काळूराम सायकर यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी कृषी सहाय्यक अशोक जाधव यांनी शेतकऱ्यांना शासनच्या कृषी विभागातील विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली असून खरीप हंगाम पूर्व तयारी नियोजन अंतर्गत ऊस बेणे प्रक्रिया, ऊस पाचट व्यवस्थापन, हुमणी कीड नियंत्रण, ठिबक सिंचन, कांदा चाळ, गोपीनाथ मुंडे शेतकरी सानूग्रह अनुदान, पौष्टीक धान्य यांसह आदी बाबींची माहिती देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान तानाजी राऊत यांनी सर्वांचे आभार मानले.