महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह संपन्न

शिरूर तालुका

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दीन साजरा करण्यात करत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देत बियाणांची तसेच खतांची माहिती देत मार्गदर्शन करुन कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषि विभागाचे विविध तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचिण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कृषि संजीवनी सप्ताह निमित्त उपविभागीय कृषि तंत्र अधिकारी शिरीष भरती यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला कृषि तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कृषि सहाय्यक अशोक जाधव, कृषि पर्यवेक्षक सुनील मोरे, कृषी मित्र तानाजी राऊत, नंदा भुजबळ, प्रतिभा खेडकर, स्वाती बैलभर, मनीषा चव्हाण, चारुशीला मांढरे, विद्या मांढरे, अमृता बैलभर, अश्विनी राऊत, चारुशीला मांढरे, मंगल केवटे, वैजयंती डोमाळे यांसह आदी उपस्थित होते, यावेळी महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या विविध योजना महाडीबीटी, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, पी एफ एम ई योजना, पीक विमा तसेच बियाणे बीजप्रक्रिया पेरणी करताना खताचा वापर सुपिकता निर्देशकानुसार खत वापर, नॅनो युरियाचा वापर, तणाचा नियंत्रण यांसह विविध योजनांची माहिती उपविभागीय कृषि तंत्र अधिकारी शिरीष भरती यांनी शेतकऱ्यांना दिली. तर कृषि सहाय्यक अशोक जाधव यांनी बाजरी बीज प्रक्रिया शेतकऱ्यांना दाखविली. यावेळी कृषी मित्र तानाजी राऊत व कृषि पर्यवेक्षक सुनील मोरे यांनी सर्वाचे आभार मानले.