मुंबई महापालिकेचे रुग्णालय की ‘रेफरल सेंटर’? राष्ट्रवादीकडून आरोग्य विभागावर गंभीर आरोप

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून, महापालिका रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. घाटकोपर पश्चिम येथील संत मुक्ताबाई रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्णालयातील मनुष्यबळाचा तुटवडा, उपचारासाठी होणारी दिरंगाई आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. १७ […]

अधिक वाचा..
pooja-gai-shirur

Video: शिरूरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप…

शिरूर: शिरूर शहरातील बाबुरानगर येथील एका खासगी रुग्णालयात हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया सुरू असताना एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पूजा राहुल गई (वय २८) असे मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप तिच्या पतीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील बाबुरानगर परिसरात असलेल्या ‘कोळपे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल’मध्ये […]

अधिक वाचा..

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचे काम ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. […]

अधिक वाचा..

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडलेल्या एका गंभीर घटनेने वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव, मानवता आणि परस्पर समन्वयाचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ‘आनंद हॉस्पिटल’ आणि ‘वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मधील डॉक्टर व […]

अधिक वाचा..

जेजुरी मार्गावरील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा संवेदनशील हस्तक्षेप; घटनास्थळापासून रुग्णालयापर्यंत घेतली धाव

पुणे: सासवड–जेजुरी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. तसेच जखमींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यात यावेत आणि आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. अपघाताची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी पालखी […]

अधिक वाचा..
archana-gaikwad-shirur

शिरूर तालुक्यात खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन; महिलेचा मृत्यू…

शिरूर : एका विवाहित महिलेने खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना न्हावरे येथे घडली आहे. या घटनेमुळे न्हावरे परिसरासह शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) अर्चना विठ्ठल गायकवाड (वय ३४) असे मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. […]

अधिक वाचा..
dr-sunita-pote

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना, एका महिला डॉक्टरने भररस्त्यात प्रसूती करून त्या मायलेकीचे प्राण वाचवले आहेत.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) शिरूर शहरातील जोशीवाडी येथील एक गरोदर महिला आज (शनिवार) सकाळी प्रसूती कळा सुरू झाल्याने शिरूर […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गर्भलिंग तपासणीसारख्या कायद्याने पूर्णपणे बंदी असलेल्या घृणास्पद प्रकाराला शिरुरमध्ये आता हायटेक रूप मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे ‘गर्भलिंग निदान’ करुन देणाऱ्या रॅकेटचा आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील एका गर्भलिंग निदान करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरूर तालुक्यात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन करून मोबाईल ॲपच्या सहाय्याने गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंटवर कठोर […]

अधिक वाचा..

गर्भाशयातील गाठी काढण्याच्या नावाखाली गर्भाशयच काढले; पुण्यात त्या हॉस्पिटलच्या 4 डॉक्टरांसह 5 जणांवर गुन्हा

पुणे: गर्भाशयातील गाठ काढण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या ३५ वर्षीय महिलेचे गर्भाशयच काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात साई केअर हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांसह पाच जणांविरुद्ध शस्त्रक्रियेत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई केअर हॉस्पिटलचे डॉ. संदीप कराड, डॉ. मंदार साहुजी, डॉ. निहाल शेख, डॉ. शेहजाद शेख आणि सूरज कांबळे […]

अधिक वाचा..