akshada midugale

शिरूर तालुक्यातील मुलीच्या उपचारासाठी हवाय मदतीचा हात!

शिरूर तालुका

शिरूर: शिरूर तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलीला उपचारासाठी पुणे शहरातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या उपचारासाठी सहा लाख रुपयांची गरज आहे. आपण मदतीचा हात पुढे केल्यास तिच्यावरील उपचारासाठी मोठी मदत होणार आहे. मुलीच्या नातेवाईकांनी मदतीचे आवाहन केले आहे.

शिरूर तालुक्यातील कोरडवाहू असलेल्या मूळ मिडगुलवाडी गावचे पण पोटाची खळगी भरण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे मोलमजुरी करून चरितार्थ चालविणारे रेश्मा व दीपक मिडगुले या दाम्पत्याला दोन मुलीच आहेत. पहिली मुलगी आर्या दहा वर्षांची असून ती ‘विशेष’ आहे. दुसरी मुलगी आठ वर्षांची अक्षदा ही खडकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत ३ रीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

अक्षदा हिला १८ जुलै रोजी ताप आल्याचे निमित्त झाले. स्थानिक पातळीवर उपचार झाले. पण, तिची प्रकृती खालावत चाललेली पाहून तिला त्याच दिवशी पुण्याच्या के.इ.एम. रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. अक्षदाच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने व शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होत तिला झटके येऊ लागले. तिच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मुलीची आत्या ज्योती धुमाळ व त्यांच्या पतीने तात्काळ ५० हजार रुपये मदत केली तर अक्षदाचे वडील दीपक मिडगुले यांनी खडकवाडीतून अक्षदाच्या उपचारासाठी सुमारे एक लाख रुपये हात उसने घेत जमा केले आहेत. अक्षदावर उपचार, औषधे व इतर असा सुमारे सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. समाजातील दानशूर व्यक्ती सेवाभावी, समाजसेवी संस्था यांनी तात्काळ आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहान मुलीच्या आई वडिलांनी, कान्हूर मेसाईचे सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे दळवी व अक्षदाची आत्या ज्योती धुमाळ यांनी केले आहे.

अत्यंत गरीब कुटुंब असलेल्या रेश्मा व दीपक मिडगुले यांच्या अक्षदाला विविध स्तरातील दात्यांकडून मिळणाऱ्या मदतीतूनच या आजारावरील उपचारातून बरी होण्यास मदत होणार आहे. अक्षदाच्या उपचारासाठी मदत करणाऱ्या नागरिकांनी दीपक फक्कड मिडगुले यांच्या पुढील खात्यावर रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बँक खाते पुढीलप्रमाणे:
Dipak fakad midgule,
BRANCH :PABAL173,
Account No:60263606457,
IFSC Code:MAHB0000173,
Account type: maha sarvajan savings Bank यावर

फोन पे, गुगल पे : 9960201971

अधिक माहितीसाठी संपर्क:
सुभाष शेटे – ९९७५६७४२८६