पाबळ रुग्णालय सुरु होण्यापूर्वी संघटनांकडून स्वच्छता

शिरूर तालुका

पाबळचे ग्रामीण रुग्णालय बुधवार पासून नागरिकांच्या सेवेत

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालय अनेक दिवसांपासून बंद असल्याने बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांसह आदी संघटनांनी आक्रमक शिक्रापूर पवित्रा घेतल्याने अखेर प्रशासनाकडून 8 फेब्रुवारी रोजी रुग्णालय सुरु करत असल्याबाबतचा शब्द मिळाल्यानंतर अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी हजेरी लावत रुग्णालय परिसराची स्वच्छता करुन मोठ्या उत्साहात रुग्णालय सुरु होण्याच्या प्रारंभाचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालय संपूर्ण इमारत उभी असून देखील गेली अनेक वर्षांपासून बंद असल्याने यापूर्वी बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांनी आंदोलनाचा इशारा दिला तर श्रीमंत बाजारीराव मस्तानी प्रतिष्ठान व सहकारी संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरु केल्यावर रुग्णालय आठ फेब्रुवारी रोजी सुरु करण्याची ग्वाही आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती.

श्रीमंत बाजारीराव मस्तानी प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, बजरंग दल व माजी सैनिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालय परिसर पूर्ण स्वच्छ केला. यावेळी तब्बल 700 किलो कचरा यावेळी आम्ही जाळला असल्याचे सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले असून उद्या देखील रुग्णालय स्वच्छता करणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी चंद्रशेखर वारघडे, संजय डहाळे, राज गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सचिन वाबळे, संजय जाधव, माजी सैनिक सुनिल चौधरी, संपत चौधरी, नितीन शेंबडे, सुमंत शेळके, अजित जाधव यांसह आदी उपस्थित होते तर पाबळ सह परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.