कान्हूर मेसाई (सुनील जिते) सध्याचे युग हे डिजिटल असून सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाइन असणाऱ्या विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन सहायक निबंधक अरुण साकोरे यांनी मलठण या ठिकाणी केले. मलठण (ता.शिरुर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र, डिजिटल सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष दंडवते, उपाध्यक्ष मथुरा जगताप, संचालक नाना फुलसुंदर, शरद गीते, सुभाष सोनवणे, महादू गायकवाड, शरद दंडवते, ज्ञानदेव कदम, साळभाऊ शिंदे, दिपक महाले, बिरा शिंदे, चंदरराव मावळे, वसंत दाते, सोसायटीचे सचिव मोहन वाव्हळ, सागर कदम, कान्हूर मेसाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव सुखदेव खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.