महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; छत्रपती संभाजीनगरसह 29 महापालिकांतील प्रवर्ग निश्चित

मुंबई: महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर निवडला जाणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक महापालिकांमध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर? छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग […]

अधिक वाचा..

मुख्याध्यापकांसह शिक्षकांसाठीही ‘टीईटी’ बंधनकारक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्षण विभागाची स्पष्टता सोलापूर: इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, हा निर्णय केवळ शिक्षकांसाठी असून मुख्याध्यापकांना लागू नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. यावर आता माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडत मुख्याध्यापकांनाही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे […]

अधिक वाचा..

ॲग्रिस्टॅक, जमीन नोंद व उत्पन्नासह ‘या’ १० निकषांवर मिळणार आता रेशन

मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिका पडताळणी अधिक कडक पुणे: राज्यभरात शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानांतर्गत राज्य सरकारने रेशनकार्ड पडताळणीसाठी १० कडक निकष लागू केले आहेत. यामध्ये आता ॲग्रिस्टॅक योजनेतील जमीन नोंद, उत्पन्नाची माहिती, दुबार शिधापत्रिका यांसारख्या मुद्द्यांचा थेट समावेश करण्यात आला आहे. ॲग्रिस्टॅकद्वारे शेतकऱ्यांच्या जमीनधारणेची डिजिटल नोंद होत असून, एक हेक्टर (अडीच एकर) […]

अधिक वाचा..

मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका:! भाजपाचे यश खरंच किती प्रामाणिक?

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकांनंतर, जवळपास सर्वच न्यूज चॅनेल्स व वर्तमानपत्रांतून “भाजपाची मुसंडी”, “दणदणीत यश”, “२६ महापौर भाजप-युतीचे” अशा मथळ्यांनी वार्तांकन करण्यात आले. मात्र, या वार्तांकनामध्ये खरी परिस्थिती आणि मूलभूत प्रश्नांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपाचे यश: विकासाचे की पक्षांतराचे भाजपाच्या या यशामागील कारणे काय आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. हे यश […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू माफियाचा हैदोस; शेतकऱ्याच्या कुटुंबासह ६ महिन्यांच्या गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी–लगडवाडी परिसरात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा उघडकीस आली असून, बेकायदेशीर वाळू वाहतुकीला विरोध केल्याच्या रागातून एका शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांवर अमानुष हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ६ महिन्यांची गरोदर महिला, वृद्ध आईसह चौघे जखमी झाले आहेत. लक्ष्मण मारुती कोळपे (वय ३९, रा. चिंचणी, ता. […]

अधिक वाचा..

जमिनीच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; १४ जणांसह अनोळखी ७ आरोपींवर गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळवस्तीमध्ये जमिनीच्या वादातून मुलमुले कुटुंबावर दहशतीचा हल्ला झाला. लोखंडी रॉड, फावडे व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ व जीव मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा १४ जणांसह इतर सात अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिदास देविदास मुलमुले (वय 45, धंदा […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांत माजी आमदारासह अकरा जणांवर गुन्हा

शेतकऱ्याच्या नावावरून बँकेचे कर्ज काढून पन्नास लाखांची फसवणूक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील शेतकरी सचिन बाळासाहेब गरुड यांच्या जमिनीवरून सहकारी संस्थेतून कर्ज काढून, प्रत्यक्ष कर्जदारास रक्कम न देता संगनमताने लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

ठाण्यासह कोकणात तुफान पाऊस बरसणार, परतीच्या पावसाचा राज्यभरात धुमाकूळ

मुंबई: भारतीय हवामान विभाग (IMD), स्थानिक हवामान अभ्यासक आणि उपलब्ध माहितीवर आधारित आज (14 सप्टेंबर) रोजी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र (depression) आणि परतीच्या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.तर विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण मुंबई, ठाणे, पालघर, […]

अधिक वाचा..

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचारी विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शिवसेना (उबाठा), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षाने आंदोलनाची हाक दिली असून उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर हे आंदोलन करण्यात […]

अधिक वाचा..

मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

सरकारच्या निर्णयाबद्दल मराठा समाजाचे केले अभिनंदन… मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने पहिल्या दिवसापासून सकारात्मक व संवेदनशील भूमिका घेतली होती. आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने सतत प्रयत्न केले. त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय घेऊन आज शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..