दोन महिन्यांपासून बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर; कोल्हापुरात कुटुंबीयांचे आंदोलन, तपासावर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर: जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर (वय ५२) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री जेवणासाठी घराबाहेर पडलेले पिळणकर अद्याप घरी परतलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप केला आहे. […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत प्रतिमांवरून नवा वाद; महापौरांच्या कृतीवर कोल्हापुरात संताप

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र, डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर शेजारील राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला हार न घालता केवळ नमस्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून कोल्हापूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]

अधिक वाचा..

कोल्हापूर जिल्ह्यातील २०,३१० रेशनधारकांचे धान्य बंद

शासकीय कर्मचारी, मृत लाभार्थी व सहा महिने धान्य न घेणाऱ्यांचा समावेश कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २० हजार ३१० रेशनधारकांना आता रेशनचे धान्य मिळणार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून धान्य न घेणारे, शासकीय सेवेत असलेले तसेच मृत व्यक्तींच्या नावावर सुरू असलेल्या शिधापत्रिकांचा या कारवाईत समावेश आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्ह्यातील मोठ्या वर्गाला अन्नसुरक्षाअंतर्गत धान्य दिले जाते. यामध्ये […]

अधिक वाचा..

कोल्हापूरचे माजी गोकुळ अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई: कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विश्वासराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशावेळी शिरोली दुमला […]

अधिक वाचा..

कोल्हापूरचा १५ वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा

कोल्हापूर मधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजयाचा निर्धार कोल्हापूर: कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विराट जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. […]

अधिक वाचा..

कोल्हापूरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याची शपथ

मुंबई: राजकीयदृष्ट्या सतर्क असलेल्या कोल्हापूर जिल्हयातील दिग्गज लोकांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणण्यामध्ये हसन मुश्रीफ यांनी किमया केली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी हसन मुश्रीफ यांचे कौतुक केले. रणजीतसिंह पाटील आणि राजेखान जमादार या दोघांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद मजबूतपणे उभी राहणार आहे. हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कोल्हापूर जिल्ह्यात […]

अधिक वाचा..

कोल्हापुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घातलं लक्ष

कोल्हापूर: कोल्हापुरामध्ये दोन गटांत वाद होता. पोलिसांनी वाद नियंत्रणात आणलेला आहे; पण ज्यांनी दंगली घडविली, त्या सर्वांवर कारवाई होणार, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना दिला. भाजप जातीय दंगली घडवून आणत आहे, या विरोधकांच्या टीकेला त्यांनी उत्तर द्यायचे टाळले. विरोधकांना काही कामधंदा उरलेला नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ […]

अधिक वाचा..

आता कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ, दीर्घ लढ्याला मोठं यश

कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनीही त्याची माहिती सर्वप्रथम माजी खासदार संभाजीराजेंना दिल्याचंही […]

अधिक वाचा..

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकडे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारीक लक्ष आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला. यापुढेही कोल्हापूरला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करु, अशी ग्वाही शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते […]

अधिक वाचा..

कोल्हापूरच्या राजचं आगमन ही गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा, एकात्मता, संस्कृतीचा मोठा उत्सव

कोल्हापूर: कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्र मंडळाच्या ‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागल्याची, भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. ‘कोल्हापूरचा राजा’ ही संकल्पना २०१२ मध्ये मंत्री. डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरु झाली. २०१२ मध्ये त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेशमुर्ती गोल […]

अधिक वाचा..