अधिवेशन काळात सत्ताधारी व विरोधीपक्षात सांगड घालण्याचा प्रयत्न केला; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये काही विकासासाठी पूरक विधेयकही मंजूर झाली. पूर्ण काळ चाललेल्या अधिवेशनात राजकीय मुद्यांवर काही चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये विसंवाद होवू नये म्हणून उपसभापती या नात्याने दोन्ही बाजूशी संवादाच्या माध्यमातून सांगड घालत सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडल्याची भावना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नाव असलेला ‘तो’ फोटो बनावट…

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर शहरातील अनेक ठिकाणी औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे लिहिण्यात येत आहे. तर शहरातील शासकीय कार्यालयावरील फलकाचे नावं देखील बदलली जात आहे. मात्र महानगरपालिकेवरील नाव औरंगाबाद असल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत होती. दरम्यान आता महापालिका प्रशासनाने देखील […]

अधिक वाचा..

कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला…

मुंबई: कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यासंदर्भात […]

अधिक वाचा..

तमाशा पहायला गेला अन् घरी चोरट्याने साधला डाव…

शिरुर (अरुणकुमार मोटे): मांडवगण फराटा येथील ज्ञानोबा संताराम शेरे यांचा मुलगा श्याम हा मांडवगण फराटा येथे तमाशा पहाण्यासाठी गेला असता त्याला घरी यायला उशीर होईल म्हणुन खोलीचा दरवाजा ढकलुन दरवाजाची कडी न लावता कुटुंब झोपी गेलो असता चोरट्यांनी डाव साधत घरातील ७०, ००० रु. रोख रक्कम व सोन्याचे २ तोळयाचे दागिणे मिळून तब्बल १, ७०, […]

अधिक वाचा..

ठाण्यात बिरेवाडीच्या लेकीने उमटविला ठसा; १३ वर्षांपासून देतायेत प्रशिक्षण

मुंबई: फोर व्हीलर किंवा टू हिलर वाहन चालवायचं म्हटलं की, काही नियमावली असते. त्यासाठी वाहन चालवायचे धडे चक्क ग्रामीण भागातील महिला शेकडो विद्यार्थी अथवा विद्यार्थ्यांना देण्याच कार्य करत आहेत. गेल्या १३ वर्षांपासून ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या ठाणेसारख्खा शहरात वर्षा मोटार ड्रायव्हिंग स्कूलची स्थापना करत शेतकरी कुटुंबातील सबळ व सक्षम महिला कृषीकन्या वर्षा संतोष पारधी यांनी […]

अधिक वाचा..

लोकप्रतिनिधींनी मर्जीतल्या ठेकेदारांना काम देण्याचा घातलाय घाट, त्यामुळे विकास कामांची लागतीये वाट

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात काही दिवसांपासुन अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनीच्या फंडातुन विकासकामे चालु असुन ती कामे आर्थिक फायद्यासाठी आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला मिळावीत यासाठी राजकीय पुढारी कर्मचाऱ्यांपासुन ते अधिकाऱ्यांपर्यंत सेटिंग लावत आहेत. तसेच स्थानिक गावातील सरपंच ते तालुक्यातील सगळ्यांच लोकप्रतिनिधींनीचे या विकासकामात आर्थिक हितसंबंध असल्याने कामाचा दर्जा मात्र घसरत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. शिरुर […]

अधिक वाचा..

महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून कायदा करावा; डॉ. अमोल कोल्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केले जात असून अनेक महापुरुषांचा देखील अवमान केला जात असल्याने महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केली आहे. महाराष्ट्रामध्ये वारंवार महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केले जात असल्याने शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी […]

अधिक वाचा..