तमाशा पहायला गेला अन् घरी चोरट्याने साधला डाव…

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): मांडवगण फराटा येथील ज्ञानोबा संताराम शेरे यांचा मुलगा श्याम हा मांडवगण फराटा येथे तमाशा पहाण्यासाठी गेला असता त्याला घरी यायला उशीर होईल म्हणुन खोलीचा दरवाजा ढकलुन दरवाजाची कडी न लावता कुटुंब झोपी गेलो असता चोरट्यांनी डाव साधत घरातील ७०, ००० रु. रोख रक्कम व सोन्याचे २ तोळयाचे दागिणे मिळून तब्बल १, ७०, ००० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 20) फेब्रुवारी रोजी रात्री ९: ३० ते (दि .२१) फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजल्याच्या सुमारास ज्ञानोबा शेरे हे पत्नी व मुलगी सह घरात झोपले होते व मुलगा श्याम हा मांडवगण फराटा येथे तमाशा पहाण्यासाठी गेला होता. तो उशीरा येईल म्हणुन त्यांनी स्वयंपाक घराचा दरवाजा आतून लावुन दुसऱ्या खोलीचा दरवाजा ढकलुन दरवाजाची कडी न लावता ते झोपी गेले.

त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी उघडया दरवाजावाटे घरात प्रवेश करून स्वयंपाक खोलीत असलेल्या लोखंडी पेटीतील रोख रक्कम व २ तोळे सोन्याचे दागिने असा माल चोरी करून नेला आहे. या अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक संतोष खबाले हे करत आहे.