तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल मलठण येथे संपन्न

शिरूर अरुणकुमार मोटे): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे,शिरूर तालुका क्रीडा संघटना न्यू इंग्लिश स्कूल मलठण व सागरआप्पा दंडवते स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल मलठण च्या प्रांगणात तालुकास्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन दि.५,६,७ सहा सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. शिरूर तालुक्यातील विविध शाळेतील १४, १७ व१९ वर्ष वयोगटातील […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात त्या ग्रामीण रुग्णालयातील औषधाचा साठा संपला, रुग्णांचे आरोग्य धोक्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले मलठण (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क औषधाचा साठा संपल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील बेफिकीरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या रूग्णालयाची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रभारी […]

अधिक वाचा..

महसूल सप्ताह मलठण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

पाबळ (सुनिल जिते): महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस कृती आराखड्यानुसार व महसूल विभागाच्या आदेशानुसार “महसूल सप्ताह २०२५” अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दि. २५/०८/२०२५ रोजी मंडल मलठण, (ता. शिरूर), येथे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या शिबिरात “जिवंत सातबारा” मोहिमेंतर्गत खातेदारांच्या वारस नोंदी करून दुरुस्ती सातबारा व फेरफार तयार करण्यात आले. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांचा छापा

सहा जण अटकेत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण गावाच्या हद्दीत फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई (दि. ५) ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात […]

अधिक वाचा..

मलठणच्या सावी ताठेचे राष्ट्रीय स्तरावर यश! सेबर तलवारबाजीमध्ये महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदकाची कमाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या तेराव्या मिनी आणि सातव्या चाइल्ड नॅशनल फेन्सिंग चॅम्पियनशिप 2025-26 मध्ये पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मलठण येथील सावी संतोष ताठे हिने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदक पटकावले. सावीने दहा वर्षाखालील सेबर प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना देशभरातील एकूण ३२ स्पर्धकांमध्ये आठव्या क्रमांकावर आपले स्थान […]

अधिक वाचा..

मलठण ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरकडून परिचारिकेला शिवीगाळ करत धमकी; डॉ.राजेश जाधव निलंबित

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता.शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेला धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी व कर्मचाऱ्यांशी उद्धट वागल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी परिचारिका विद्या गिरीगोसावी यांनी बाह्यरुग्ण विभागातील […]

अधिक वाचा..

मलठणमध्ये भीषण अपघात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक अपघातस्थळावरून फरार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण-शिंदेवाडी परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय गणेश रामदास शितकल या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला असून शिरूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही दुर्घटना २२ एप्रिल रोजी रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश शितकल (रा. कवठे येमाई) हा त्याच्या ताब्यातील बजाज […]

अधिक वाचा..

मलठणच्या शिंदेवाडीतील आठ कुटुंबांची बांधकाम व्यावसायिकांकडून लाखोंची फसवणूक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठणच्या शिंदेवाडी, वरुडे आणि निमगाव दुडे येथील आठ कुटुंबांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावातील चार कॉन्ट्रॅक्टर्सकडून तब्बल ५५.९१ लाखांची फसवणूक झाल्याची गंभीर तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारदारांच्या माहितीनुसार, वैजनाथ मोहिते, अजय पवार, नामदेव पवार आणि मोहन चव्हाण या चौघांनी गावात आठ ते नऊ महिने वास्तव्य करून घरबांधणीची […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात गळफास घेवून युवकाची आत्महत्या…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण येथील १९ वर्षाच्या युवकाने राहत्या घरी गळाफास घेवून आत्महत्या केली आहे. तन्मय रामदास कदम (वय -१९, रा. मलठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सत्तू कदम (वय ४२, रा. मलठण) यांनी याबाबतची माहिती शिरूर पोलिस स्टेशनला दिली आहे. २ मार्च रोजी रात्री सव्वाबाराचा दरम्यान […]

अधिक वाचा..

माता पालक मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मलठण येथे मोठ्या उत्साहात साजरा

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व शाळा व्यवस्थापन समिती मलठन यांच्या संयुक्त विद्यमाने माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीचे पूजनाने करण्यात आली. यावेळी माता पालक यांना पालक म्हणून जबाबदारी काय असते,मुलांना कसे संस्कार दिले पाहिजेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यामध्ये शिकणारे मुलेही प्रत्येक क्षेत्रात […]

अधिक वाचा..