शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण येथील १९ वर्षाच्या युवकाने राहत्या घरी गळाफास घेवून आत्महत्या केली आहे. तन्मय रामदास कदम (वय -१९, रा. मलठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सत्तू कदम (वय ४२, रा. मलठण) यांनी याबाबतची माहिती शिरूर पोलिस स्टेशनला दिली आहे. २ मार्च रोजी रात्री सव्वाबाराचा दरम्यान तन्मय हा गावातील वरातीला जावून घरी झोपण्यासाठी आला व शेजारील खोली मध्ये दार लावून झोपला होता. त्यानंतर ३ मार्च रोजी दुपारी रामदास कदम यांनी मुलगा तन्मय याला तो झोपलेल्या खोलीचा दरवाजा वाजून गोठ्यातील फॅन चालू कर म्हणून आवाज दिला होता. परंतु, त्यांने काही एक आवाज दिला नाही. त्यानंतर तन्मय याचा भाऊ ऋषभ यांने दुपारी जनावरांना खाद्य आणण्यासाठी गाडीची चावी घेण्यासाठी तन्मय झोपला त्या खोलीचा दरवाजा वाजवला असता तन्मय यांने खोलीचा दरवाजा उघडला नाही.
ऋषभ याने खोलीचे खिडकी उघडून आत डोकावून पाहिले असता तन्मय यांने खोलीचे लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळी मुलगा, ऋषभ याने वडिल रामदास यांना आवाज देवून वरील प्रकार सांगितला असता ते सदर खोलीचा दरवाजा तोडून आत गेले असता मुलगा तन्मय यांने खोलीचे लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. याबाबतचा अधिक तपास शिरूर पोलिस स्टेशन करत आहेत.
शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
शिरूर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; ११ जणांवर गुन्हे दाखल…
शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…