शिरुर तालुक्यातील शिंदेवाडी येथे बैलगाडा घाटात भावकीत तुंबंळ हाणामारी; एकाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील शिंदेवाडी येथे रविवार (दि २८) रोजी खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरु असताना बैलगाडा घाटातच भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे व संजय रखमा शिंदे या स्थानिक नागरीकांमध्ये पुर्वीच्या हाणामारीच्या वादातुन अचानक भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाली. बैलगाडा घाटात झालेल्या मारहाणीत संजय रखमा शिंदे […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र सुरुच

मलठणच्या शिंदेवाडीतून शेळ्यांची चोरी शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरांचा सुळसुळाट झाला असुन या चोऱ्या रोखण्यात शिरुर पोलिसांना अपयश येत आहे. अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या मलठण (ता.शिरूर) येथील शिंदेवाडी येथून शुक्रवारी (दि.१९) रोजी रात्री बापू शिंदे यांच्या तीन शेळ्या चोरीस गेल्या आहेत. शिरुर पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढविणे गरजेचे असुन प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल […]

अधिक वाचा..

दुकानदारांनो सावधान! दुकानदाराला बोलण्यात गुंतवुन चोरट्यांनी ३४ हजार रुपये केले लंपास

शिरूर तालुक्यात टोळी सक्रिय शिरुर (अरुणकुमार मोटे): वस्तू खरेदीच्या बहाण्याने अज्ञात व्यक्ती दुकानात गर्दी नसताना दुकानात येऊन बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानाच्या गल्ल्यातील, ग्राहकांच्या खिशातील पैसे घेऊन जाणारी टोळी पुणे जिल्हयासह तालुक्यात, तालुक्यातील ग्रामीण भागात सक्रिय झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मलठण (ता. शिरूर) येथील अतुल यशवंत थोरात यांच्या गुरूदत्त किराणा दुकानामध्ये कोल्ड्रींक्स घेण्याच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात पानटपरीवर पानाचे पैसे दिले नाहीत म्हणत हाणामारी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात पानटपरीवर पानाचे पैसे दिले नाहीत म्हणत लोखंडी पाईप, दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मलठण (ता. शिरूर) येथे विकास सुभाष बोडरे (वय २३ वर्षे ) याने पानटपरीवर खाल्लेल्या पानाचे पैसे दिले असतानाही पानाचे पैसे दिले नाहीत, पैसे दे असे म्हणत […]

अधिक वाचा..

मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील बेट भागातील बिबट्यांचे हल्ले वाढले असून मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कासाबाई ठकाजी शिंदे (रा. शिंदेवाडी, मलठण) या थोरातवाडी भागात मेंढ्याचा कळप चारून सायंकाळी तळावर घेवून जात असताना अचानक बिबट्याने हल्ला करून त्यांच्या समोर […]

अधिक वाचा..

मलठण येथून विवाहीत महीला बेपत्ता

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथून कान्हुपात्रा विशाल कदम (वय २५) मुळगाव वसवाडी, बार्शीरोड, पाकरसांगवी, राजेशिवाजीनगर, जि. लातुर ही महीला मलठण येथील मोमीन भाभी यांच्या खोलीत भाडयाने राहत असून राहत्या घरातून ती बेपत्ता झाली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी, की विशाल कदम यांची पत्नी कान्हूपात्रा कदम (दि. १५) जानेवारी रोजी सकाळी ११: ५३ वा. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील मलठण येथे अंधश्रद्धेपोटी अघोरी प्रकार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मलठण येथे मलठण – शिरुर रोडवरील एम.आर. एफ.टायर शोरुमच्या समोरील बाजूस जागा मालक नागेश दत्तात्रय महामुनी यांच्या नवीन पाया बांधकाम असणाऱ्या भिंतीवर गुलाल, लिंबू, टाचण्या, नारळ असे वाहून जादूटोण्याचा अघोरी प्रकार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. नारळ, लिंबे, कापड व अघोरी कृत्य करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इतर साहित्याचा या अघोरी कृत्यासाठी […]

अधिक वाचा..

आण्णापूर ते मलठण या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुरवरुन पाबळ, राजगुरुनगर, भिमाशंकर तसेच पारगाव, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या मोठ्या गावांना जाणारा तसेच अष्टविनायक महार्गाला जोडणारा जवळचा व दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा महामार्ग आहे. परंतू या रस्त्यावरील आण्णापूर ते मलठण या रस्त्याची खड्डयांमुळे मोठी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांचे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डयांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे. […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ जनजागृती फेरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने “हर घर तिरंगा” च्या माध्यमातून “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले असल्याने महावितरणच्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी यांनी एकत्र येऊन कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मलठण (ता. शिरुर) येथे याबाबत जनजागृती केली आहे. शिरुर उपकार्यकारी अभियंता माने, […]

अधिक वाचा..