मुंबई हादरली! ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, ८ मुलींचा समावेश, पोलिसांचा हाय अलर्ट

मुंबई: मुंबईकरांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवघ्या मागील ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून, यामध्ये ८ मुलींचा समावेश आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मुले बेपत्ता झाल्याने मुंबई पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. ही मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहेत. […]

अधिक वाचा..

लहान शहरांना वेग, मुंबई–महाराष्ट्राला बळ! विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: लहान आणि मध्यम शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, पायाभूत सुविधा मजबूत करणारा आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठे प्रोत्साहन देणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला नवे बळ देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या स्वप्नाच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल […]

अधिक वाचा..

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

मुंबई: राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एम,एस,एम,ई,) क्षेत्राच्या कार्यक्षमता व उत्पादकतेत वाढ करून उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’ या जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) व निर्यात प्रचालन उपक्रमांद्वारे निर्यातवृद्धीस चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे. मुंबई उपनगरासाठी 2 फेब्रुवारी 2026 […]

अधिक वाचा..

एफटीआयआय व फिल्मसिटी मुंबईमार्फत अल्पकालीन चित्रपट अभ्यासक्रमवर्ग

मुंबई: पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय, लघुपट कथा लेखन तसेच चित्रपट निर्मिती व चित्रपटसृष्टीतील करिअर संधी यावर आधारित अल्पकालीन अभ्यासक्रमवर्ग आयोजित करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम २ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चित्रांगण सभागृहात होणार आहेत. […]

अधिक वाचा..

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एग डोनेशन–सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिलांना अटक

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सहार पोलिसांनी मोठी कारवाई करत ठाणे जिल्ह्यातून चालवण्यात येणाऱ्या बेकायदेशीर एग डोनेशन आणि सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचे धागेदोरे देशासह परदेशापर्यंत पसरल्याचे तपासात समोर आले आहे. बँकॉकहून येताच पोलिसांची कारवाई कल्याण येथील रहिवासी सुनौती बेलल (वय 44) हिला शुक्रवारी दुपारी 1.30 […]

अधिक वाचा..

भावना नव्हे तर विकास जिंकला; मुंबईतील नगरसेवकांना शिंदेंचा संदेश

सत्ता म्हणजे विकास, त्यात भेदभाव नको;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरसेवकांना स्पष्ट संदेश मुंबई: वॉर्डच्या विकासासाठी सत्तेचा योग्य वापर करा, कामांचे शॉर्ट, मिड आणि लाँग टर्म नियोजन ठरवा आणि मत दिले-न दिले अशा प्रत्येक नागरिकासाठी समान न्यायाने काम करा, असे ठाम निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले. मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड […]

अधिक वाचा..

मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका:! भाजपाचे यश खरंच किती प्रामाणिक?

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकांनंतर, जवळपास सर्वच न्यूज चॅनेल्स व वर्तमानपत्रांतून “भाजपाची मुसंडी”, “दणदणीत यश”, “२६ महापौर भाजप-युतीचे” अशा मथळ्यांनी वार्तांकन करण्यात आले. मात्र, या वार्तांकनामध्ये खरी परिस्थिती आणि मूलभूत प्रश्नांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपाचे यश: विकासाचे की पक्षांतराचे भाजपाच्या या यशामागील कारणे काय आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. हे यश […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेच्या राजकारणात निर्णायक वळण

१० नामनिर्देशित नगरसेवकांमुळे सत्तासमीकरणे बदलणार मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सदनात आता दहा नामनिर्देशित नगरसेवक नेमले जाणार आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेने २०२३ मध्ये मंजूर केलेल्या विधेयकामुळे यापूर्वी असलेली पाच नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या आता दुप्पट झाली आहे. या बदलाचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडील बीएमसी निवडणुकीत […]

अधिक वाचा..

मुंबई निकालानंतर काँग्रेसमध्ये वाद! वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची भाई जगताप यांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून अपेक्षेपेक्षा कामगिरी सुधारली असली तरी सत्तेच्या समीकरणात पक्षाची भूमिका मर्यादित राहिली आहे. निकालानंतर काही तासांतच काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

मुंबई महापौरपदावर सस्पेन्स कायम; फडणवीस शिंदे बसून निर्णय घेणार

मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक निकालात बहुसंख्य ठिकाणी भाजप–शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, अहिल्यानगर आदी महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, या सत्तेनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागले आहे. महापौर कोणाचा होणार, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवणारे वक्तव्य केले […]

अधिक वाचा..