रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेतर्फे सहेली वस्ती शाळेतील मुलांना दूध देऊन नागपंचमी साजरी

शिरुर (किरण पिंगळे) महिलांनी नागपंचमी हा सण साजरा करावा. परंतु दूध आणि लाह्या वारुळात ओतून देण्यापेक्षा जिथे जमेल तिथे गरजूंना दूध वाटप करावे. देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. म्हणून सर्व माता-भगिनी यांनी आपले विचार बदला आणि समाजउपयोगी कार्य करत रहा असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. सोमवार […]

अधिक वाचा..

करंदीत नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी

महिलांनी लुटला हळदीकुंकू सह फुगड्यांचा आनंद शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) सह परिसरात श्रावण महिन्यातील महत्वाचा असा पहिलाच नागपंचमी सन मोठ्या उत्साहात साजरा झाला असून दोन वर्षांनी प्रथमच नागपंचमी पूर्णपणे खुल्या पद्धतीने साजरा होत असल्याने महिलांनी हळदीकुंकू सह फुगड्यांचा आनंद लुटल्याचे देखील दिसून आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथे नागपंचमी सन साजरा होत असताना गावातील सर्व […]

अधिक वाचा..

मराठा महासंघाच्या वतीने अनोख्या पद्धतीने नागपंचमी सण साजरा

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अखिल भारतीय मराठा महासंघ व रामलिंग महिला उन्नती संस्थेने नागपंचमीच्या प्रथेला फाटा देत वारुळात दूध सोडण्याऐवजी गरजू चिमुकल्यांना दूध वाटप केले एवढेच नव्हे तर विधवांना सुवासिनींचा मान देऊन अनोख्या पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा केला. नागपंचमीला सुवासिनीच्या हस्ते नागदेवतेची पूजा करुन नागाला दूध म्हणून या दिवशी शेकडो लिटर दूध वारुळांमध्ये सोडले जाते. […]

अधिक वाचा..

नागपंचमीनिमित्त सर्पमित्रांनी दिली विद्यार्थ्यांना सापांबाबत जनजागृती

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे नागपंचमीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सापांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सापांबाबत माहिती देत मार्गदर्शन केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे नागपंचमीच्या निमित्त वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने सापांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे […]

अधिक वाचा..
Waghale Nagpanchami

वाघाळे गावात नागपंचमी निमित्त दगडी गोट्या उचलून शक्तिप्रदर्शन…

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) गावामध्ये आज (मंगळवार) नागपंचमी निमित्त दगडी गोट्या उचलून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघाळे गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी हनुमान मंदिरासमोर दगडी गोटी उचलण्याची फार जुनी परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षे हा उत्सव होऊ शकला नाही. परंतु, सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उतावरणात अनेक पहिलवानांनी गोट्या उचलून आनंद साजरा […]

अधिक वाचा..
loni nagpanchami

नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक भवन बाजार तळ येथे नागपंचमी निमित्त आज (मंगळवार) शाहीर रामदास गुंड सूर्यावाले विरुद्ध शाहीर नासाहेब साळुंखे तुरेवाले यांच्यात हा महाराष्ट्रातील भव्य कलगीतुरा सामना रंगला होता. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हा कलगीतुरा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी कलगीतुरा शोकिनांनी मोठी गर्दी केली होती. […]

अधिक वाचा..
kalgitura

नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (तालुका आंबेगाव) येथे नागपंचमीच्या दिवशी कलगीतुराचे आयोजन दरवर्षी केले जाते. येत्या मंगळवारी नागपंचमीला २/८/२०२२ रोजी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले आहे. कलगीतुरा स्थापना सुरुवात सन १९९३ झाली. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, श्रीगोंदा, पारनेर आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहत असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुरा लोणी (तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) या ठिकाणी […]

अधिक वाचा..