नागपंचमीनिमित्त सर्पमित्रांनी दिली विद्यार्थ्यांना सापांबाबत जनजागृती

शिरूर तालुका

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे नागपंचमीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सापांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सापांबाबत माहिती देत मार्गदर्शन केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सिद्धिविनायक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे नागपंचमीच्या निमित्त वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने सापांबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, सचिव शेरखान शेख, बाळासाहेब मोरे, अमोल कुसाळकर, सिद्धिविनायक ट्रस्टचे संस्थापक सोमनाथ सायकर, चेअरमन मनीषा सायकर, विश्वस्थ बाबुराव साकोरे, अक्षय गायकवाड, प्राचार्य गौरव खुटाळ, उपप्राचार्य उज्वला दौंडकर यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भाडळे व सचिव शेरखान शेख या सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे प्रत्येक सापांचे वर्णन व माहिती सांगत विषारी व बिनविषारी सापांसह सापांबाबत समज, गैरसमज तसेच अंधश्रद्धा याबाबतची माहिती देत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शंकेचे निराकरण करत योग्य माहिती दिली, तर विद्यार्थांनी देखील सर्पमित्रांना अनेक प्रश्न विचारात माहिती घेतली तर यावेळी बोलताना सर्प हे शेतकऱ्यांचे मित्र असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य उज्वला दौंडकर यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य गौरव खुटाळ यांनी केले आणि विश्वस्त बाबुराव साकोरे यांनी आभार मानले.