Waghale Nagpanchami

वाघाळे गावात नागपंचमी निमित्त दगडी गोट्या उचलून शक्तिप्रदर्शन…

शिरूर तालुका

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) गावामध्ये आज (मंगळवार) नागपंचमी निमित्त दगडी गोट्या उचलून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाघाळे गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी हनुमान मंदिरासमोर दगडी गोटी उचलण्याची फार जुनी परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षे हा उत्सव होऊ शकला नाही. परंतु, सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उतावरणात अनेक पहिलवानांनी गोट्या उचलून आनंद साजरा केला.

या प्रसंगी गावचे सरपंच दादा सोनवणे, चेअरमन बबन भोसले, माजी उपसरपंच दिलीप थोरात, माजी उपसरपंच पप्पू भोसले, संदीप धायबर, संतोष गोरडे, एकनाथ डफळ, दत्तात्रय गायकवाड, पोलिस पाटील बाळासाहेब माकर, मारुती थोरात (गुरुजी), अरुण कारकूड आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक कराः