वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला! वर्दी फाडून बेदम मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण: कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर भर चौकात कारमधील त्रिकुटाने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात घडली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हल्लेखोरांनी पोलिसाची वर्दी फाडून बेदम मारहाण केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात विलास सुरेश भागीत (वय 33) हे वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कल्याणमधील फोर्टीस […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीतील आरोग्य अधिकाऱ्यांची सेवा ‘रामभरोसे’;  ग्रामस्थांकडून बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामात दिरंगाई व कर्तव्यात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून होत असून आधिकारी निवासी राहत नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची वरीष्ठ अधिकार्यांनी […]

अधिक वाचा..

UPSC ची शेवटची संधी हुकल्याने बालविकास अधिकाऱ्याने संपवल आयुष्य

लातूर: यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने ३६ वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईट नोटदेखील आढळून आली आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मिळालेल्या माहितीनुसार, रामदार श्रीरामे, असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अमरावतीला ट्रेनिंग जातो, असं सांगून ते घरातून निघाले होते. त्यांनी […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे आज हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन, राजकीय वर्तुळ तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कायम सर्वांना मदत करणारे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या काळात सर्वात वेगवान बातम्या देण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अत्यंत दिलदार, मदतगार, सर्वांशी […]

अधिक वाचा..

‘तो’ आधिकारी घेतोय एसीची थंडगार हवा, शेतकऱ्यांना मात्र देतोय चांगलीच सजा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख उपअधीक्षक सध्या नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. कारणही तसंच! कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने एसी लावून अधिकारी थंडगार हवेत मजा मारताना दिसत असून, दुसरीकडे आपल्या अडचणी घेऊन आलेले शेतकरी तासन्‌तास दरवाजाबाहेर ताटकळत उभे राहत आहेत. एकीकडे हवामान तापमानाची मर्यादा पार करत आहे, शेतकरी घाम गाळत आपली कामे करून सरकारी दारात […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातील गोरक्षक अजिंक्य तारु यांची ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ पदी नियुक्ती 

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील सामाजिक, धार्मिक आणि गोरक्षण क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे बजरंग दलाचे प्रमुख कार्यकर्ते अजिंक्य तारु यांची महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती” अंतर्गत मानद प्राणी कल्याण अधिकारी या अत्यंत सन्माननीय पदावर नियुक्ती झाली आहे. या निवडीमुळे शिरुर शहर, तालुका तसेच संपुर्ण पुणे जिल्ह्यातुन विविध सामाजिक संघटना, नागरिक, तरुण कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची संधी

जहांगीर आर्ट गॅलरी येथे २२ जुनपर्यंत प्रदर्शन मुंबई: प्रशासकीय अधिकारी म्हणून चोख सेवा बजावताना आपल्या कलागुणांची जपणूक करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. ‘ व्हिस्पर्स ऑफ द वुड्स : अब्स्ट्रॅक्ट इंप्रेशन्स’ या नावाने सुरू असलेले हे चित्र प्रदर्शन २२ जूनपर्यंत पाहता येणार आहे. प्रशासकीय अधिकारी सौ. […]

अधिक वाचा..

निलेश वाळुंज यांच्या तक्रारीनंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याची अण्णापूर शाळेला तातडीने भेट

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षणाच्या दयनीय परिस्थितीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी उचललेल्या आवाजानंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे. मागील दीड-दोन वर्षांपासून अन्नापुर ता. शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षकाच्या जागा रिक्त होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. संबंधित शिक्षकाच्या अनुपस्थितीमुळे निलंबनाची कारवाई उशिराने झाली, मात्र नवीन शिक्षक नेमण्यास शिक्षण […]

अधिक वाचा..

विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसाकडून अश्लील कृत्य

पुणे: विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या नराधम पोलीस सचिन सस्ते हा लघुशंकेचा बहाणाकरून हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी […]

अधिक वाचा..

धडाकेबाज IAS अधिकारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती

संभाजीनगर: आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले. धडाकेबाज आयएएस अधिकारी विभागीय […]

अधिक वाचा..