दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर…

नागपूर: नागपूरची संत्री, भ्रष्ट आहेत मंत्री… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर… गद्दार सत्तार राजीनामा द्या राजीनामा द्या… अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा…संत्र्याला भाव, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… आटली बाटली फुटली, भूखंड खाताना लाज नाही वाटली… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली. हिवाळी अधिवेशनाचा […]

अधिक वाचा..

प्रती सभागृह उभे करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल…

नागपूर: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे तो ठराव घ्या, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही मात्र सोमवारी […]

अधिक वाचा..

सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे…

कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही; अजित पवार नागपूर: सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला. काल कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई एक इंचही जमीन देणार नाही म्हणाले त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये निवडणुक प्रक्रियेच्या मतपेट्या वाहण्यासाठी चक्क एका राजकिय पक्षाच्या नेत्याच्या खाजगी वाहनाचा वापर

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात नुकतेच ४ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रकिया पार पडली. सोनेसांगवी, करंजावणे येथील ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रीयेसाठी शिरुर तहसिल कार्यालयातून करंजावणे, सोनेसांगवीपर्यंत मतपेट्या वाहून नेण्यासाठी शासकिय आधिकाऱ्यांनी चक्क शासकिय एस.टी चा वापर न करता चक्क एका राष्ट्रवादी पक्षाच्या बडया नेत्याच्या ट्रॅव्हल्सचा वापर केला आहे. त्या गाडयांचा बोर्डही झाकण्यात आला नव्हता. या ट्रॅव्हलच्या मालकाने सोने […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन…

नागपूर: शिंदे – फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरु […]

अधिक वाचा..

सख्या भावांच्या बायकांना ग्रामपंचायत निवडणुकीत समान मते; आणि मग…

औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील एका ग्रामपंचायतचा हटके निकाल हाती आला आहे. सख्या मावस भावांच्या बायका ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र मतमोजणी सुरु असतानाच दोन्ही उमेदवारांना समान मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यानंतर एकीचा विजय तर दुसरीचा पराभव झाला आहे. कन्नड तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सख्या मावस भावांच्या अर्धागणी निवडणुकीत आमने सामने होत्या. पूजा सचिन […]

अधिक वाचा..

आमदारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न; अजित पवार

नागपूर: विदर्भातील, मराठवाड्यातील, उत्तर महाराष्ट्रातील मागासवर्गीय भागातील प्रश्न विचारात घेऊन विरोधी पक्षाचा प्रस्ताव आज सभागृहात मांडण्यात येणार होता. यात सीमाप्रश्न, महापुरुषांचा होणारा अपमान, नागपूर येथील भूखंड प्रकरण अशा विविध विषय मांडण्यात येणार असताना सत्ताधारी पक्ष काही वेगळ्याच भूमिकेत असल्याची शंका विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर उपस्थित केली. जी व्यक्ती आपल्यात हयात नाही तिच्याविषयी […]

अधिक वाचा..

कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज…

नागपूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका अवलंबत आहे. त्यामुळे आता मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेतली पाहिजे, कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश […]

अधिक वाचा..

देशातील तरुणपिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र

मुंबई: भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जात असून १६ ते ४० वयोगटातील देशातील लोकसंख्या ५० टक्के आहे, ही तरुणपिढी देशाचे भवितव्य आहे. देशाचे भवितव्य असेलली ही पिढीच नशेखोर बनत असून देशातील १० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने त्याची दाहकता किती आहे हे स्पष्ट होत आहे. […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीचा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल…

सांगली: राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपचे सरकार करत आहे त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..