महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन…

इतर

नागपूर: शिंदे – फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे आमदार पायर्‍यांवर आंदोलन करत आहेत.