निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा…

मुंबई: दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे. मात्र हा अंतिम निर्णय आहे, असे वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित दिसते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोग आपली कार्यवाही […]

अधिक वाचा..

जनमताचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी संधी…

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी मराठवाडा विभागाच्या दौर्‍यावर असून त्यांनी अहमदनगर व औरंगाबाद येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांकडून पक्ष वाढीसंदर्भात त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. मागील काळात आपल्या या जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणावर पवार साहेबांना ताकद दिली होती याची आठवणही […]

अधिक वाचा..

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का…

मुंबई: बारामतीमध्ये साकार होणार असणारा बिबट्या सफारी प्रकल्प आता जुन्नर इथे साकारण्याचा निर्णय घेत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प बारामतीमध्ये साकारण्याबाबतचा निर्णय घेतला होता. शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी बारामती बिबट्या सफारी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे नाममात्र मुख्यमंत्री; महाराष्ट्राचा कारभार मोदी-शाह यांच्या इशाऱ्यावरच…

मुंबई: महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा 2 लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात राज्यात जाणे हे अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालतो हे स्पष्ट झालेले आहे. मोदी- शाह यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून एकनाथ शिंदे हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत. फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यास सरकारकडे वेळ नसणे हे वेदनादायी…

मुंबई: स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान हा मिळायलाच हवा, मात्र आज सत्ताधारी हे वेगवेगळ्या कामात गुंतले आहेत. त्यांना जनतेशी देणंघेणं नाही. त्यामुळे त्यांना गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांनाही भेटण्यासाठी वेळ नसणे हे वेदनादायी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर…

मुंबई: राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांवरील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी आणखी काही महिने वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवार (दि. 12) रोजी घेतला. त्यामुळे या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आणखी काही काळ लांबणीवर पडणार आहेत. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कालावधी मार्च २०२२ मध्ये संपलेला आहे. परंतु आधीच्या […]

अधिक वाचा..

दिल्लीकरांच्या नादाला लागून गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये…

मुंबई: १९९३ साली दंगल झाली तेव्हा मुंबई शिवसेनेने वाचवली, बाबरी मशीद पडली त्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उचलली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याच व ती फोडण्याच पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केल. त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांनी पैठण येथील सभेत […]

अधिक वाचा..

पक्षाने मला बोलायला सांगितलं होत पण नेमक काय झालं?

मुंबई: दोन वर्षाच्या कालावधीनंतर दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाषणाची संधी हुकल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर आता स्वतः अजित पवार यांनी घडलेल्या प्रकारावर भाष्य करत पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी याबाबतचा खुलासा केला. दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर तुम्ही […]

अधिक वाचा..

सत्ता तर ओरबाडून घेतली पण कामाचा मात्र अजूनही पत्ता नाही…

पुणे: सत्ता ओरबाडून घेतली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर केली आहे. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. गणेशोत्सवात गणेश मंडळांना मुख्यमंत्री भेट देत होते. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पण जावे, असा […]

अधिक वाचा..

शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र…

मुंबई: शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र आहे हे पुन्हा एकदा प्रभादेवी येथील घडलेल्या प्रकरणावरुन अधोरेखित झालं आहे. आमदार सदा सरवणकर बंदुकीचा धाक दाखवत असताना देखील निर्भीडपणे सामोरे गेलेल्या शिवसैनिकांच्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. पोलिसांनी या शिवसैनिकांना सोडल्यानंतर थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची […]

अधिक वाचा..