राज्यात ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना मदतीची गरज, पण कृषिमंत्री गायब; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. आदित्य ठाकरे मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं. कृषिक्षेत्र आणि शेतकरी त्रस्त आहेत. कुठलीही मदतीची हाक सरकारकडून आलेली नाही. ओला दुष्काळ जाहिर करण्याची वेळ असताना कृषीमंत्री कुठे दिसत […]

अधिक वाचा..

अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही…

मुंबई: जोपर्यंत अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून तात्काळ बडतर्फ करावे यासाठी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणी केली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या खासदार सुप्रियाताई […]

अधिक वाचा..

स्वतःचा इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार; आदित्य ठाकरे

मुंबई: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत. आज संभाजीनगर इथे आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा आदित्य यांनी खरपूस समाचार घेतला. राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे राज्यातून तरुणांचा रोजगार […]

अधिक वाचा..

राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे त्यामूळे न घाबरता घोडगंगात परिवर्तन करा:- महसूलमंत्री

मांडवगण फराटा (संपत कारकूड): सहकार चळवळीत चढउतार होत असतात. शेतकऱ्यांच्या मालकीची कारखाना हीच एकमेव संस्था आहे. येथेच शेतकरी अधिकाराने बोलू शकतो. सध्या निकोप स्पर्धा राहिलेली नाही. ९० टक्के साखर ही सहकारी साखर कारखान्यात होत असते. परंतु आता ४५ टक्के साखर तयार होते. सहकारी कारखानदारी आता अडचणीत आहे. ती टिकण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने […]

अधिक वाचा..

घोडगंगाच्या कामगारांचे हक्काचे पैसे द्या, त्यांचा तळतळाट घेऊ नका: सुधीर फराटे

न्हावरे (तेजस फडके): ज्यांच्या कष्टातून घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या सुरु आहे. त्या कामगारांचे गेल्या सात महिन्यांपासून वेतन थकीत आहे. कामगारांना १२ टक्के पगारवाढ जाहीर करण्यात आली होती. परंतु एप्रिल २०१९ पासून आजपर्यंतचा फरक थकीत असुन कामगारांचे रिटेंशन सन २००९-१० पासून मिळाले नाही. कामगारांचा पी एफ जून २०२२ पासुन भरलेला नाही. विमा पॉलिसीचे हप्ते सात […]

अधिक वाचा..

आमच्यावर टिका करता तर तुम्ही स्वतःला आणि मुलाला उमेदवारी का घेतली?: दादा पाटील फराटे

निर्वी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखान्याची रणधुमाळी सुरु झाली असुन ऐन थंडीतही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राजकीय वातावरण मात्र तापले आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि शेतकरी विकास पॅनलचे अशोक पवार यांनी घोडगंगा किसान क्रांती पॅनलला उमेदवार मिळत नसल्याने एकाच गावातले दोन उमेदवार उभे केले असल्याची टिका केली होती. याला प्रतिउत्तर देताना […]

अधिक वाचा..

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एक घोडगंगा सहकारी साखर कारखाना असताना आणि अशोक पवार स्वतःच त्या कारखान्याचे अध्यक्ष असताना तालुक्यातच दुसरा खाजगी साखर कारखाना काढण्याच पाप आमदार अशोक पवार यांनी केल असुन घोडगंगा साखर कारखाना म्हणजे राजकारणाचा अड्डाच झाला आहे. त्यांचा स्वतःचा खाजगी कारखाना नफ्यासाठी चालवता आणि घोडगंगा साखर कारखान्यातील कामगारांना मात्र पाच महिने पगार […]

अधिक वाचा..

आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत; जयंत पाटील

जळगाव: आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत आहे. आपण स्वाभिमान जपला म्हणून आपण ताठ मानेने लोकांच्या समोर जावू शकतो. त्यामुळे लोकांपर्यंत जा. येत्या दीड – दोन वर्षात निवडणुका लागतील. आपण लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेत येवू अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जळगाव शहर व जिल्हयाचा आढावा […]

अधिक वाचा..

जागतिक पातळीवर गौरवलेले महाविकास आघाडी सरकार कपटाने पाडण्यात आले…

कोल्हापूर: महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले. ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र कपटाने सरकार पाडण्यात आले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे केली. फुटीर आमदारांच्या मतदारसंघात फिरून […]

अधिक वाचा..

आपली लढाई लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी; जयंत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..