पक्षाने मला बोलायला सांगितलं होत पण नेमक काय झालं?

राजकीय

मुंबई: दोन वर्षाच्या कालावधीनंतर दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाषणाची संधी हुकल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर आता स्वतः अजित पवार यांनी घडलेल्या प्रकारावर भाष्य करत पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी याबाबतचा खुलासा केला. दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर तुम्ही नाराज आहेत का ? असा सवाल माध्यमकर्मीनी दादांना विचारला असता ते म्हणाले, “मी कशाला नाराज होऊ, नाराज व्हायचं कारण काय ? सकाळी १० वाजेपासून बसल्यानंतर तुम्हाला दीड दोनला वॉशरुमला जावस वाटणार नाही का ? मी सगळ्या कार्यकर्त्यांना भेटत होतो. मी कशाला नाराज होऊ ? पक्षाने मला उपमुख्यमंत्रीपद दिल, पक्षाने मला विरोधीपक्षनेते पद दिल, आज मी जबाबदारीनं पक्षाचं काम करतोय नाराज व्हायचं कारण काय ? आम्ही सगळ्यांनी एकमताने पवार साहेबांचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं असल्याचे देखील पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

यावेळी नेमकं काय म्हणाले अजित पवार 

“मला अजिबात पक्ष डावलत नाही. पक्षाने मला बोलायला सांगितलं होत, पण मीच तुम्हाला सांगतो की बराच कार्यक्रम लांबला होता ३ वाजेपर्यंत कोणी जेवलेलं नव्हतं पवार साहेबांचं मार्गदर्शन होत आणि अध्यक्षीय भाषणाची आम्ही वाट पाहत होतो. कार्यकर्ते देखील नाराज नसल्याचं स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.