सस्पेंड केलं तरी चालेल! बाबासाहेबांच्या नावावरून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महिला पोलिसांचा पालकमंत्र्यांना थेट जाब

नाशिक: संपूर्ण देशात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमधून एक वेगळीच आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान मोठा गोंधळ उडाला. भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट जाब विचारला. वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी पालकमंत्र्यांच्या […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य व सेवापदक विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शौर्य व सेवा पदकांमध्ये महाराष्ट्रातील ८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश झाला आहे. या सर्व पुरस्कार विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रातील ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’, उत्कृष्ट व विशिष्ट सेवेसाठी ६ अधिकाऱ्यांना […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताकदिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन अनिवार्य

१०० टक्के विद्यार्थी उपस्थितीचे उद्दिष्ट; सुट्टी देऊ नये; शिक्षण आयुक्तांचे आदेश मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये येत्या प्रजासत्ताकदिनी (ता. २६) देशभक्तिपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य असल्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती राहील याची दक्षता शाळांनी घ्यावी, […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे […]

अधिक वाचा..

एन.डी.स्टुडीओत प्रजासत्ताक दिनी शालेय विद्यार्थांचा कलाविष्का

कलादिग्दर्शक नितिन देसाईंनी सुरु केलेली परंपरा फिल्मसिटीने जोपासली मुंबई: महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्जत येथील एन. डी स्टुडीओ येथे प्रजासत्ताक दिनी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सुरू केलेला हा उपक्रम महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताकदिनी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीचे राज्यभर आयोजन

मुंबई: भाजपाकडून संविधान व संविधाननिर्मात्याचा सात्यत्याने अवमान केला जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान, राज्यघटना, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर ३ जानेवारीपासून हे अभियान सुरु झाले असून २६ जानेवारी रोजी मध्य […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा गौरव…

मुंबई: एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या एकूण सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विना अपघात सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील एसटीच्या ७८० चालकांचा सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजाराचा धनादेश असे २५ वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांच्या सत्काराचे स्वरूप […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी मुंबईत ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन

मुंबई: राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या अकराव्या अखिल भारतीय मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुशायऱ्यात देशभरातून १७ नामवंत शायर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास सर्वांना प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन […]

अधिक वाचा..