प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा गौरव…

महाराष्ट्र

मुंबई: एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या एकूण सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विना अपघात सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील एसटीच्या ७८० चालकांचा सपत्नीक सत्कार केला जाणार आहे.

प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजाराचा धनादेश असे २५ वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांच्या सत्काराचे स्वरूप राहणार आहे. राज्यभरात प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये विभाग नियंत्रक यांच्या हस्ते व मुख्यालयात मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते सदर चालकांचा सत्कार आयोजीत करण्यात आला आहे.

सद्यस्थितीला ST महामंडळाकडे २४ हजार ३८९ चालक कार्यरत असून अशा गौरव समारंभाच्या माध्यमातून विना अपघात सेवा करण्याऱ्या चालकांचा सत्कार हा इतर चालकांना प्रेरणादायी ठरावा आणि भविष्यात अपघात विरहीत सेवा देणाऱ्या चालकांची संख्या वाढून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी सर्व चालकांनी घ्यावी अशी अपेक्षा मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केली आहे.