ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी केले. राज्याच्या मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालयाच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन २०२६’ निमित्त शासकीय विधी महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते […]

अधिक वाचा..

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, जिवंत आणि प्रखर अभिनयाने चार दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके झाले आहे. त्यांच्या निधनाने केवळ एक महान अभिनेता नव्हे, तर समाजाच्या दुःखाशी थेट जोडलेला अत्यंत संवेदनशील […]

अधिक वाचा..

मेट्रो परिसरातील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा; सचिन अहिर यांची पाहणी

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असली, तरी मेट्रो परिसरातील जागा अद्याप संबंधित संस्थांकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी वरळी येथील आचार्य अत्रे चौक आणि नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानक परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मेट्रो प्रकल्पासाठी ज्या जमिनी […]

अधिक वाचा..

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असतानाच विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांनी ही […]

अधिक वाचा..

‘मित्रपक्षाची साथ मिळाली नाही’; पुण्यातील पराभवावर सचिन अहिरांची खंत, संघटना बळकट करण्याचा निर्धार

पुणे: विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुण्यात शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त करत, मित्रपक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही, असे स्पष्ट केले. तसेच आगामी काळात पुण्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी स्वतः अधिक वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे उपसभापती झाल्यानंतर सोमवारी प्रथमच पुणे दौऱ्यावर आलेल्या […]

अधिक वाचा..

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन अहिरांच्या हाती विधान परिषदेच्या उपसभापती पदाची धुरा

‘पक्षापेक्षा नियम मोठे, भावनेपेक्षा परंपरा मोठी’; उपसभापती म्हणून सर्वांना समान न्याय देण्याचा विश्वास मुंबई: राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत त्यांचे अभिनंदन करत त्यांना “राजकारणातील मास्टर ब्लास्टर” अशी उपमा दिली. नियम, संयम आणि न्यायाच्या बळावर सचिन अहिर उपसभापतीपदाला नवी उंची देतील, […]

अधिक वाचा..