राज्यात दोन उपमुख्यमंत्री तर दोन उपसरपंच पद्धतही लागू करा…

वैजापुर तालुक्यातील माजी सरपंचांची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी… संभाजीनगर: राज्यात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात असलेल्या मनूर येथील माजी सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी दोन उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

बाभुळसर खुर्द येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे सरपंच सोनाली फंड यांच्या हस्ते भूमिपूजन 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि शिरुर -आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच शिरुर पंचायत समिती यांच्या 15 व्या वित्त आयोग, बंदित निधीतून बाभुळसर गावासाठी 10 लाख रुपये चा जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. या कामाचे भूमिपूजन बाभुळसर खुर्द गावच्या सरपंच सोनाली फंड व उपसरपंच […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरकारी कामात अडथळा करणाऱ्या माजी उपसरपंचाचा जामिन फेटाळला

शिरुर (अरुणकुमार मोटे): दस्तांच्या सात बारा नोंदी तुम्ही का करत नाही…? असे म्हणत प्लॉटिंगच्या सात बारा नोंदीच्या कारणावरुन महिला तलाठी सुशिला गायकवाड यांच्याशी वाद घालत जातीवाचक शिविगाळ करुन सरकारी कामात अडथळा करणाऱ्या शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी फेटाळला असल्याची माहिती अ‍ॅड राकेश सोनार यांनी दिली आहे. रमेश राघोबा […]

अधिक वाचा..

जातीवाचक शिविगाळ व सरकारी कामात अडथळा आणणारा माजी उपसरपंच आरोपी अद्याप मोकाट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील महीला तलाठी सुशिला गायकवाड यांना रमेश थोरात यांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या ऑफिस मधील कागदपत्रे इकडे तिकडे फेकुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी, सरकारी कामात अडथळा अश्या कलमान्वये रमेश थोरात यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटूनही अदयाप शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केले नाही. आरोपी शिक्रापूर परीसरामध्ये मोकाट फिरत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात आदर्श सरपंच पुरस्काराचे फुटलेय पेव

अर्थाजन करुन मिळवला जातोय “आदर्श सरपंच पुरस्कार”  शिरुर (तेजस फडके): पुर्वी गावचा सरपंच म्हटल की, झुपकेदार व पिळदार मिशा, धोतर, कुर्ता, पायतान, जाकीट, डोक्यावर टोपी अथवा पटका असा पेहराव असलेला भारदस्त व्यक्ती असायचा त्याला गावात राजकीय विरोध असला तरी गावातील सर्वजण त्या व्यक्तीला मान सन्मान आणि त्याच्या शब्दाला किंमत द्यायचे. माञ काळ बदलला तस राजकारण […]

अधिक वाचा..

खंडाळे गावच्या सरपंचपदी कविता संतोष खेडकर यांची बिनविरोध निवड

रांजणगाव गणपती (तेजस फडके): खंडाळे (ता. शिरुर) गावच्या सरपंच पदी कविता संतोष खेडकर यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सरपंच ज्योती मारुती नरवडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदी कविता खेडकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर […]

अधिक वाचा..

सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत केले अनोखे आंदोलन…!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील घटना… औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी आज पंचायत समिती कार्यालया फुलंब्रीसमोर तब्बल दोन लाख रुपयांची उधळण करीत शेतकऱ्यांसाठी न्याय मागितला असून पंचायत समितीमध्ये दाखल विहिरीचा प्रस्ताव मंजूर करताना 12 टक्के रक्कम मागितली जाते असा आरोप त्यांनी यावेळी केला. पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात माजी उपसरपंचाला ऐन यात्रेवेळी पोलिसांकडून अटक

शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घालत फोडली काच शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये दारु पिऊन आरडाओरडा करत गोंधळ घालून पोलिसांच्या अंगावर धावून जात कपाटाची काच फोडल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केंदूरच्या ऐन यात्रेवेळी माजी उपसरपंच राजेंद्र हिरालाल ताठे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या उपसरपंचावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल पांडुरंग खरपुडे व वैभव पांडुरंग खरपुडे या दोघांवर एका महिलेकडून बिल्डींग मटेरियल खरेदी करुन तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच विशाल खरपुडे यांनी यापूर्वी छाया मोरे यांच्याकडून बांधकाम साठी लागणाऱ्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात त्या उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याला दणका

जिल्हाधिकाऱ्यां नंतर विभागीय आयुक्तांनी दोघांना ठरवले अपात्र शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर मांदळे या दोघांना यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवलेले असताना त्यांनी नुकतेच विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत दोघांना देखील अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे. खैरेवाडी […]

अधिक वाचा..