बाभुळसर खुर्द येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे सरपंच सोनाली फंड यांच्या हस्ते भूमिपूजन 

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि शिरुर -आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच शिरुर पंचायत समिती यांच्या 15 व्या वित्त आयोग, बंदित निधीतून बाभुळसर गावासाठी 10 लाख रुपये चा जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. या कामाचे भूमिपूजन बाभुळसर खुर्द गावच्या सरपंच सोनाली फंड व उपसरपंच अरुण शिंदे यांच्या हस्ते रविवार (दि 18) रोजी पार पडले.

या भूमिपूजन कार्यक्रमासाठी गावचे पोलिस पाटील मच्छिंद्र सातपुते, विकासोचे अध्यक्ष सोन्याबापु डाळिंबकर, उपाध्यक्ष बाळासो धरणे, माजी सरपंच दशरथ फंड, कॅप्टन संभाजी फंड आईलाजी फंड, महादेव डाळिंबकर, ग्रामपंचायत सदस्या पुजा भालेराव, सुमन शिंदे, निता डाळींबकर, लहुजी शक्ती सेनेच्या अध्यक्षा पुजा शिंदे, आरोग्य सेविका रोहिणी वाळके, वर्षाताई सुपेकर, माजी सैनिक केशव फंड तसेच गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.