जातीवाचक शिविगाळ व सरकारी कामात अडथळा आणणारा माजी उपसरपंच आरोपी अद्याप मोकाट…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील महीला तलाठी सुशिला गायकवाड यांना रमेश थोरात यांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या ऑफिस मधील कागदपत्रे इकडे तिकडे फेकुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी, सरकारी कामात अडथळा अश्या कलमान्वये रमेश थोरात यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटूनही अदयाप शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केले नाही. आरोपी शिक्रापूर परीसरामध्ये मोकाट फिरत असून, त्या बडया आरोपीवर कारवाई का होत नाही?, असा प्रश्न शिक्रापूरचे सुजाण नागरीक विचारत आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, २२ मे रोजी सकाळी ११ वा. चे सुमा. तलाठी सुशिला गायकवाड या नेहमी प्रमाणे शिकापुर ग्रामपंचायत इमारती मधील पहिल्या मजल्यावरील सरकारी कार्यालयात दैनंदीन कामकाज करत होत्या. दुपारी १२ .३० वा. चे सुमारास त्या काम करीत असलेल्या शिक्रापुर तलाठी कार्यालयामध्ये शिक्रापुर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सध्या सदस्य असलेले रमेश राघोबा थोरात हे आले होते. त्यावेळेस त्यांना काय काम आहे.

त्याबाबत तलाठी यांनी विचारपुस केली असता. त्यांनी तिला विचारले की, “माझा वैयक्तीक प्लाटींगचा व्यवसाय आहे. त्यातील विक्रीस गेलेल्या प्लॅटींग बाबत मी तुमच्याकडे सात बारा नोंदीसाठी दस्त दिलेले असताना बरेच दिवस झाले तरी सदर दस्तांचे सात बारा नोंदी तुम्ही का करीत नाही.” असे म्हणून त्यांनी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यावेळीस महिला तलाठी यांनी त्यांना समजावयाचा प्रयत्न करीत असतानाच रमेश राघोबा थोरात यांनी आम्ही सरपंच असून आमची कामे होत नाहीत” असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली.

सरकारी कार्यालयातील रजीस्टर, कागदपत्रांना इकडे तिकडे फेकून ते तेथून जात होता. त्यांनी दरवाजा जवळ थांबून परत त्या महिलेकडे रागात बघत उदयाच हयांची बदली करून टाकतो, मग बघतो कसे आमचे गावात काम करतात.” असे म्हणून रागा रागात ते सरकारी कामात अडथळा निर्माण करून तेथून निघून गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन शिक्रापूर पोलिसांनी अद्याप हा आरोपी अटक न केल्याने शिक्रापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे राहत आहे.